Apple Offer : डोकं चालवा, फायद्यात राहा; iPhone 14 च्या किमतीवर वाचवा २५ हजार रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple IPhone
Apple Offer : डोकं चालवा, फायद्यात राहा; iPhone 14 च्या किमतीवर वाचवा २५ हजार रुपये

Apple Offer : डोकं चालवा, फायद्यात राहा; iPhone 14 च्या किमतीवर वाचवा २५ हजार रुपये

Apple ने काही दिवसांपूर्वीच आपला लेटेस्ट आयफोन १४ लाँच केला आहे. याचे फिचर्स खूपच प्रगत आहेत. मात्र याची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. तरीही हौशी लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

एक अशी ऑफर आहे की ज्यामुळे आयफोन १४ ज्या किमतीवर २५ हजारांपर्यंत बचत होणार आहे. त्यामुळे तुम्हालाही आयफोन १४ खरेदी करायचा असेल तर वाट कसली पाहताय...लवकरच ही ऑफर घ्या आणि आयफोन खरेदी करा.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

काय आहे ऑफर?

फ्लिपकार्टवर ही ऑफर लागू होत आहेत. ऑनलाईन पाहिल्यास फ्लिपकार्टवर आयफोन १४ ची किंमत ७८,७४० रुपये आहे. या स्मार्टफोनवर ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये २०,५०० रुपये एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ही एक्सचेंज ऑफर आयफोन १३ प्रो मॅक्सवरही लागू होणार आहे. पण ही एक्सचेंजची किंमत जुन्या iPhone च्या अवस्थेवर ठरते.

बँकेकडून देण्यात आलेल्या ऑफर्सचा विचार केला तर फ्लिपकार्टवर HDFC चं क्रेडिट कार्ड वापरलं तर ५००० रुपयांची सूट मिळणार आहे. या सगळ्या ऑफर्स वापरल्या तर तुम्ही या iPhone 14 वर २५,५०० रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे खरेदी करताना थोडं डोकं चालवून खरेदी करा आणि फायद्यात राहा.

टॅग्स :iphoneApple iphone