आता बाळाशी कनेक्‍ट व्हा "मोबाईल'द्वारे 

Wednesday, 31 January 2018

आतापर्यंत आपण आर्टिफिशियल इंटलिजन्स किंवा मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रात होत असल्याचे ऐकले, वाचले असेल किंवा प्रत्यक्षात अनुभवलेही असेल. पण आता या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या बाळासाठीही होऊ शकतो. म्हणजे तुमचे बाळ किती वेळ झोपले आहे, त्याला आणखी चांगली झोप लागण्यासाठी काय करावे लागेल, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला वगैरे तुम्हाला एका क्षणात तुमच्या मोबाईलवर मिळू शकतो. 

एका खासगी कंपनीच्या इनोव्हेशन सेंटरमध्ये याबाबत अभ्यास सुरू आहे. बाळाने घातलेल्या कपड्यांवर लावलेल्या सेन्सरवरून त्याच्या झोपण्याच्या वेळा आणि सवयींची सर्व माहिती एका मोबाईल ऍपद्वारे नोंद केली जात आहे. एका अभ्यासानुसार झोपेअभावी अनेक बाळांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. बाळ वेळेवर आणि पुरेसा वेळ न झोपल्याचा विपरीत परिणाम पालकांवरही होतो. संबंधित कंपनीच्या एका "स्लीप ऍप'च्या माध्यमातून यापूर्वी गोळा केलेल्या साडेतीन लाख बालकांच्या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पालकांनी निश्‍चित केलेले लक्ष्य, बाळाच्या झोपण्याच्या वेळा आणि पॅटर्न या सर्व नोंदी ऍपमध्ये सुरवातीलाच केल्या जातात. त्यानंतर लहान मुलांच्या झोपेच्या तज्ज्ञांकडे ही माहिती पाठवून त्यांचा सल्ला पालकांपर्यंत पोचविला जातो. याचा फायदा असा होती की रात्री-अपरात्री तुमचे बाळ रडत असेल आणि झोपत नसेल तर नेमके काय केले पाहिजे, याबाबत पालकांना माहिती मिळते. या सर्व तंत्रज्ञानाधारित सुविधेमुळे भविष्यातील "पॅरेन्टिंग' कशा पद्धतीने बदलणार आहे याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण एक मात्र नक्की... बाळाला कसे झोपवायचे, या अवघड प्रश्‍नाचे उत्तर मिळाल्यामुळे पालकांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sci-tech news child Mobile