पाचवी क्रांती ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’

पाचवी क्रांती ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’

जरी आपण ‘माहितीचा मायाजाल’ असे म्हणत असलो, तरी तो खऱ्या अर्थाने ‘संगणकीय डाटा’चा महासागर आहे. या महासागरात आजही ‘डेटा माइनिंग’, ‘बिझनेस इंटेलिजन्स’ किंवा ‘ॲनॅलिटिक्‍स’ अशा संगणक प्रणाली डेटाचे रूपांतर माहितीत व माहितीचे रूपांतर ज्ञानात करून ज्ञानाधििष्ठत सोसायटी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत व ते मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. आजच्या काळात ‘मशिन लर्निंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिप लर्निंग’ अशा तंत्रज्ञानाची जोड मिळून अधिकाधिक ज्ञानाची प्रभावीपणे निर्मिती होणार आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व बदलांसाठी ‘हार्डवेअर’ किंवा ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ उद्योगधंद्याचे व व्यावसायिकांनी केलेल्या संशोधनाचे यात मोठे श्रेय आहे, हे विसरता येणार नाही. 

अत्याधुनिक संगणक प्रणालींसाठी आवश्‍यक असणाऱ्या नवनवीन, परिणामकारक व स्वस्त अशा हार्डवेअर व नेटवर्किंग उपकरणांची निर्मिती या उद्योगांनी केल्यानेच संगणक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडू शकतात. उत्पादन व सेवा क्षेत्र, कुठल्याही क्षेत्रांमधील उद्योग हे ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये विभागलेले असतात. त्यांना आपण ‘वस्तुनिर्मिती’ व ‘सेवापुरवठा’ करणारे उद्योग असे म्हणतो. आयटी सॉफ्टवेअर उद्योगही याला अपवाद नाहीत. जे आयटी उद्योग नवीन तंत्रज्ञान व त्यावर आधारित नवनवीन संगणक प्रणाली विकसित करतात, त्यांना ‘आयटी’ उत्पादन उद्योग असे म्हणता येईल. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा वस्तुनिर्मितीमुळे अनेक सेवा ग्राहकांना पुरविण्याच्या संधी निर्माण होतात. जे आयटी उद्योग अशा सेवापुरवठा करण्याचे काम करतात, त्यांना ‘आयटी सर्व्हिसेस उद्योग’ असे म्हणता येईल. उदा. ज्या आयटी उद्योगांनी ‘ग्राफिकल युझर इंटरफेस’ आधारित संगणक प्रणालीची निर्मिती केली किंवा ज्या उद्योगांनी ‘क्‍लाउड कॉम्प्युटिंग’सारखे तंत्रज्ञान किंवा संकल्पना मांडून योग्य संगणक प्रणाली विकसित केली, त्यांना ‘प्रॉडक्‍ट इंडस्ट्रीज’ म्हणता येईल. ज्या उद्योगांनी आधी उपलब्ध असलेल्या ‘टेक्‍स्ट व डेस्कटॉप’ बेस संगणक प्रणालीचे रूपांतर ‘ग्राफिकल व वेबबेस’ प्रणालीत केले, त्या उद्योगांना ‘सर्व्हिस इंडस्ट्रीज’ असे म्हणता येईल. संगणक क्षेत्रातील उद्योगांचा इतिहास पाहता हे दोन्ही प्रकारचे उद्योग एकमेकांस पूरक असेच आहेत. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाने, भारतीय आयटी उद्योगांनी प्रामुख्याने सेवाक्षेत्रात जगभर संधी निर्माण केल्या. 

भारतीय आयटी उद्योगांनी प्रामुख्याने सेवा क्षेत्रात जगभर मोठे योगदान दिलेले आहे. जगभरात उत्पादन उद्योग हे सेवा उद्योगांपेक्षा कमी आहेत. उत्पादन उद्योगांना तुलनेने कल्पक व्यावसायिकांची गरज असते व तुलनेने व्यावसायिकही कमी लागतात. अशा उद्योगांना व्यवसायांमधील आणि लोकांच्या गरजा व समस्या ओळखून त्यावर योग्य अशा उत्पादनाची निर्मिती करायची असते. सेवा क्षेत्रात हातात असलेल्या कामानुरूप ‘स्किलसेट’ असणारे व्यावसायिक लागतात व अशी कामे लवकरात लवकर विशिष्ट मर्यादेतच करायची असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com