
scooter exhaust water damage: पावसाळ्यात किंवा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर गाडी चालवताना अनेकदा मोटारसायकल आणि स्कूटरच्या एक्झॉस्टमध्ये म्हणजेच सायलेन्सरमध्ये पाणी जाते. पावसाळ्यात ही एक सामान्य समस्या बनते. परंतु त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. एक्झॉस्टमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद होऊ शकते, एक्झॉस्ट सिस्टमला गंज चढतो, सेन्सर्स खराब होऊ शकतात आणि वाहनाची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. अशावेळी पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जर पाणी एक्झॉस्टमध्ये शिरले तर ते ताबडतोब मेकॅनिककडे दाखवा.