फक्त ८६ हजारांत मिळेल १.६ लाखाची Bajaj Pulsar RS200 स्पोर्ट्स बाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajaj Pulsar RS200
फक्त ८६ हजारांत मिळेल १.६ लाखाची Bajaj Pulsar RS200 स्पोर्ट्स बाईक

फक्त ८६ हजारांत मिळेल १.६ लाखाची Bajaj Pulsar RS200 स्पोर्ट्स बाईक

देशात स्पोर्ट्स बाईक सेगमेंटला पसंत करणाऱ्या बाईकप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे बजाज, हिरो, होंडा, सुझुकी, यामाहा आणि टिव्हीएस सारख्या कंपन्यांनी या बाईकची एक मोठी रेंज मार्केटमध्ये आणली आहे. जर तुम्हालाही स्पोर्ट्स बाईक आवडत असेल. मात्र महागडी असल्याने खरेदी करणे जमत नसेल तर आम्ही तुम्हाला बजाज पल्सर आरएस २०० वर मिळणाऱ्या ऑफरविषयी सांगणार आहोत. यात तुम्ही या १.६३ लाख रुपये किंमतीची स्पोर्ट्स बाईक केवळ ८६ हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. मात्र त्यापूर्वी तुम्हाला या बाईकचे फिचर्स, मायलेज आणि स्पेसिफिकेशनची पूर्ण तपशील जाणून घेणे गरजेचे आहे. (Bajaj Pulsar RS200)

बजाज पल्सर आरएस २०० बाईक एक प्रीमियम स्पोर्ट्स बाईक आहे. दमदार डिझाईन आणि स्पीडमुळे ती पसंतीला उतरते. या बाईकमध्ये कंपनीने १९९.५ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे लिक्विड कुल्ड फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित डीटीएसआय एफआय इंजिन आहे. हे इंजिन २४.५ पीएसचे पाॅवर आणि १८.७ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ६ स्पीड गिअरबाॅक्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Electric Scooter : दिवाळीला खरेदी करा 'या' टाॅप इलेक्ट्रिक स्कूटर्स

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर कंपनीने तिचे दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे काॅबिनेशन दिले आहे. बजाज पल्सर आरएस २०० ची मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की बाईक ३५ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते. या बाईकचे पूर्ण तपशील जाणून घेतल्यानंतर आता तिच्यावर मिळणाऱ्या ऑफरविषयी जाणून घेऊया...

- या स्पोर्ट्स बाईकवर ऑफर दिले आहे सेकंड हँड बाईक खरेदी-विक्री करणारे संकेतस्थळ BIKES24 ने. तिने पल्सरला आपल्या साईटवर लिस्ट केले आहे आणि तिची किंमत ८६ हजार रुपये ठेवली आहे. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे माॅडल २०१८ आहे. तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. बाईक आतापर्यंत ३५ हजार १२१ किलोमीटर धावली आहे. तिची नोंदणी उत्तर प्रदेशच्या UP14 आरटीओमध्ये आहे. या बजाज पल्सर आरएस २०० बाईक खरेदीवर कंपनी काही अटींसह एक वर्षाची वाॅरंटी आणि सात दिवसांत मनी बॅक गॅरंटी प्लॅन देऊ करित आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार, ही बाईक खरेदीच्या सात दिवसाच्या आत पसंत न आल्यास तुम्ही ती कंपनीला परत करु शकता. त्यानंतर कंपनी तुमचे पूर्ण पेमेंट परत करेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bajaj Auto
loading image
go to top