
Maruti Alto 800 खरेदी करा २ लाखांच्या बजेटमध्ये, वाचा प्लॅन
नवी दिल्ली - देशात कार सेक्टरच्या सेगमेंटमध्ये सर्वात कमी किंमतीत कार मिळते. ज्यात जास्त मायलेजसह प्रीमियम फिचर्स ही असतात. याच स्वस्त कारपैकी आज आम्ही बोलणार आहोत मारुती ऑल्टो ८०० (Maruti Alto)विषयी. ती आपल्या सेगमेंटची सर्वात स्वस्त कार आहे. तिची सुरुवातीची किंमत ३.२५ लाख (एक्स शोरुम, दिल्ली) आहे. जर तुम्ही ही कार खरेदी इच्छित करित असाल, मात्र तुमच्याकडे इतकी मोठी रक्कम नाही. तर जाणून घ्या कमी किंमतीत ही कार खरेदी करण्याच्या प्लॅनविषयी. मात्र त्या पूर्वी जाणून घ्या या कारचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी पूर्ण तपशील...
मारुती ऑल्टोच्या इंजिन आणि पाॅवरबाबत बोलाल तर कंपनीने त्यात दिले आहे, तीन सिलिंडरचे ०.८ लीटर पेट्रोल इंजिन. हे इंजिन ४८ पीएसचे पाॅवर आणि ६९ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर मॅन्युअल गिअरबाॅक्स दिले गेले आहे. मारुती ऑल्टोच्या फिचर्स म्हणाल, तर पाॅवर स्टेअरिंग, पाॅवर विंडो, एबीएस, ईबीडीसारखे फिचर्स दिले गेले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की ही कार पेट्रोलवर २२.०५ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते. ही मायलेड सीएनजीवर वाढून ३१.५९ किलोमीटर प्रतिकिलो होते. (second hand maruti alto 800 buy in 2 lakh budget)
या कारचा तपशील जाणून घेतल्यानंतर आता जाणून घ्या कमी किंमतीवर आकर्षक ऑफरसह खरेदी करण्याचे पूर्ण तपशील...
CAR24 ने या मारुती ऑल्टो ८०० च्या २०१० माॅडलला आपल्या वेबसाईटवर पोस्ट केले असून तिची किंमत ठेवली आहे १ लाख ८३ लाख रुपये. त्याबरोबर कंपनीने अनेक आकर्षक ऑफर ही देत आहे. CARDEKHO ने या मारुती ऑल्टो ८०० च्या २०१३ माॅडलला पोस्ट केले आहे. तिची किंमत ठेवली आहे १ लाख ९७ हजार रुपये. कंपनी त्याबरोबर गॅरंटी आणि वाॅरंटीचे प्लॅनही देत आहे. DROOM वेबसाईटने मारुती ऑल्टोची २०१० माॅडलला आपल्या साईटवर पोस्ट केले आहे. तिची किंमत ठेवली आहे १ लाख ४१ हजार रुपये आणि त्याबरोबर कंपनी इतर ऑफर देत आहे. जर तुम्हाला ही मारुती ऑल्टो खरेदी करायची असेल तर या तीन वेबसाईटवर पोस्ट केलेल्या कारचे तपशील वाचल्यानंतर आपल्या बजेट आणि पसंतीनुसार कोणतीही कार खरेदी करु शकता.
Web Title: Second Hand Maruti Alto 800 Buy In 2 Lakh Budget
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..