सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक क्‍लिनिक! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे व अशा वेळी आवश्‍यक सुविधांनी सज्ज असे छोटे क्‍लिनिक तुमच्या मदतीला धावून आल्यास आश्‍चर्य वाटायला नको! संशोधक अशा पद्धतीचे सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक हेल्थ क्‍लिनिक विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याद्वारे लवकरच रस्त्यावर किंवा आपल्या दारात अशा प्रकारची रोबोटिक क्‍लिनिक सेवेला हजर राहू शकेल.

सिएटलमधील "अर्टेफॅक्‍ट' कंपनीने हे क्‍लिनिक डिझाइन केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून मनुष्याचे आरोग्यमान सुधारणे, हा यामागचा उद्देश आहे. घरातील स्मार्ट डिव्हाइस, तसेच मोबाईल ऍप वापरून रुग्णांची माहितीची नोंद ठेवली जाईल. रुग्णांची आरोग्यविषयक एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकत नाही, यासारख्या अनेक आव्हानांवर मात करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे क्‍लिनिक विकसित करण्याचे ठरवले आहे. आवश्‍यक माहितीचा साठा, स्वयंचलित वाहन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित निदान अशी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच, स्मार्ट मिरर किंवा फिटनेस ट्रॅकर अशा साधनांच्या मदतीने उपलब्ध झालेली रुग्णाविषयीची माहिती ही सिस्टिम एकत्रित करेल. त्याशिवाय, रुग्ण स्वतःच ऍपमध्ये नोंदी ठेवू शकतो. हे स्वयंचलित क्‍लिनिक असून, वजन, बीएमआय, श्‍वासोच्छ्वास यांसारख्या गोष्टी सेन्सरच्या मदतीने मोजण्याची सुविधा यात असेल व त्यानुसार रुग्णाला आवश्‍यक सूचना दिल्या जातील. ""या क्‍लिनिकमुळे रुग्ण व डॉक्‍टरांमधील दरी भरून आरोग्यसेवा अधिक परिणामकारक व प्रभावी होण्यास मदत होईल,'' असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-driving robotic clinic!