'रेड हार्ट इमोजी' ठरु शकते धोकादायक! होऊ शकतो कारावास अन् दंडही

sending red heart emoji on WhatsApp can be dangerous for you check details
sending red heart emoji on WhatsApp can be dangerous for you check details

WhatsApp हे आपल्यापैकी बरेच जण वापरतात पण तुम्हाला हे App वापरताना काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की, जर तुम्ही एखाद्याला WhatsApp वरून हार्ट इमोजी (Heart Emoji) पाठवणे हे धोकादायक ठरु शकते.

भारतासह जगभरातील अब्जावधी वापरकर्ते सध्या हे इन्स्टंट मेसेजिंग App वापरत आहेत. आपल्या जवळच्या लोकांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण अनेकदा WhatsApp वर हार्ट इमोजी (Heart Emoji) पाठवतो. मात्र, जगात असे देखील असे काही देश आहेत जेथे असे काही केल्याने तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागू शकते. ओकाझ वृत्तपत्राच्या हवाल्याने गल्फ न्यूजने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड

असे दिसून आले की जर एखादी व्यक्ती दोषी आढळली तर, रेड हार्ट इमोजी पाठवल्यास दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. इतकेच नाही तर 100,000 सौदी रियाल (सुमारे 19,90,328 रुपये) इतका दंडही ठोठावला जाऊ शकतो.

sending red heart emoji on WhatsApp can be dangerous for you check details
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

सौदी अरेबियातील अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोअताज कुताबी यांनी याकडे लक्ष वेधले की व्हॉट्सअॅपवर 'रेड हार्ट' पाठवणे कायद्यानुसार "छळवणूक करणारा गुन्हा" आहे. समोरच्या व्यक्तीने तक्रार केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यांनी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे इच्छेविरुध्द इतर वापरकर्त्यांशी अप्रिय संभाषण तसेच, हार्ट इमोजीविरूद्ध चेतावणी दिली. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी त्या व्यक्तीला कायद्यानुसार दोषी सिद्ध करावे लागेल.

sending red heart emoji on WhatsApp can be dangerous for you check details
दररोज 3GB डेटा, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह सर्वात स्वस्त प्लॅन

या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, अँटी हरॅसमेंट (Anti Harassments) मध्ये तुमचे विधान, कृत्य किंवा हावभाव ज्याने प्रत्यक्ष शारीरिक किंवा समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा दुखावणे याचा समवेश होतो. तसेच त्यात व्हॉट्सअॅप सारख्या मॉडर्न तंत्रज्ञानांचा देखील समावेश होतो. रेड हार्ट आणि रेड फ्लॉवर इमोजी देखील या कायद्यात येतात. सौदी अरेबियातील अँटी फ्रॉड असोसिएशनने सांगितले की, या कायद्याचे वारंवार उल्लंघन झाल्यास, तुम्हाला 300,000 सौदी रियाल (सुमारे 59,70,984 रुपये) पर्यंत दंड देखील लागू शकतो.

sending red heart emoji on WhatsApp can be dangerous for you check details
भारतातील कर्मचाऱ्यांना खूशखबर; पाच वर्षातील सर्वाधिक पगारवाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com