Signal, Telegram आणि WhatsApp; कोणतं अ‍ॅप डेस्कटॉपसाठी बेस्ट?

whatsapp telegram signal
whatsapp telegram signal

नवी दिल्ली - जानेवारी महिन्यात व्हॉटसअ‍ॅपने त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचं नोटिफिकेसन सगळ्या युजर्सना पाठवलं होतं. त्यानतंर पॉलिसीमुळे डेटा सुरक्षित नसल्याचं म्हणत युजर्सनी व्हॉटसअ‍ॅपला इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. तेव्हा अचानक टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपच्या डाउनलोडिंगचं प्रमाण वाढलं होतं. दरम्यान, व्हॉटसअ‍ॅपने त्यानंतर नोटिफिकेशन स्टेटसला देऊन डेटा शेअर होणार नसल्याचं स्पष्ट केलं. यातच व्हॉटसअ‍ॅपने डेस्कटॉप व्हर्जनसाठी काही नवीन अपडेट आणले. 

व्हॉटसअ‍ॅपचं डेस्कटॉप व्हर्जन तसं सर्वांना माहिती असून त्याचा वापर सर्रास केला जातो. मात्र त्या तुलनेत टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपचं डेस्कटॉप व्हर्जन फारसं वापरलं जात नाही. तुम्हाला या तिन्ही अ‍ॅपच्या डेस्कटॉप, लॅपटॉप व्हर्जनमध्ये काय वेगळं आहे हे माहिती आहे का?

सिग्नल अ‍ॅप वेगळं
व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम लिंकच्या माध्यमातून लॅपटॉप, पीसीवर ओपन करता येतात. यासाठी व्हॉटसअ‍ॅपची web.whatsapp.com तर टेलिग्रामची web.telegram.org ही साइट आहे. मात्र सिग्नल अ‍ॅप डेस्कटॉपवर ओपन करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागतं.

टेलिग्रामचा वापर मोबाइलशिवाय शक्य
टेलिग्राम हे पीसी, लॅपटॉपवर चालवण्यासाठी मोबाइलवर अवलंबून नाही. युजर्स कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून साइन अप करून वापर करू शकतात. तर व्हॉटसअ‍ॅप, सिग्नल हे वापरण्यासाठी मात्र मोबाइल अ‍ॅप असणं आवश्यक आहे. तसंच युजर्सच्या मोबाइलवर इंटरनेट सुरु असणंही गरजेचं आहे. तरच व्हॉटसअ‍ॅप, सिग्नल अ‍ॅप पीसी, लॅपटॉवपर वापरता येते. 

लिनक्सवर व्हॉटसअ‍ॅप नाही 
सिग्नल, टेलिग्राम अ‍ॅप्स लिनक्ससह इतर प्लॅटफॉर्मवर आहे. मात्र व्हॉटसअ‍ॅप लिनक्सवर चालत नाही. टेलिग्राम आणि सिग्नल युजर्स पीसी, लॅपटॉपवर कॉल करू शकतात. मात्र अद्याप व्हॉटसअ‍ॅप डेस्कटॉप व्हर्जनवर कॉलिंगची सुविधा आलेली नाही. त्याची चाचणी सुरु आहे. बेटा टेस्टिंग असलेल्या युजर्सना त्याचा वापर करता येतो.

व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅपला कॉन्टॅक्ट सिंक करण्याची सुविधा आहे. या तीनही अ‍ॅपमधून डेस्कटॉप व्हर्जनला कॉन्टॅक्ट नावासह दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com