सिंगापूरमध्ये तलावांची निगा राखतात राजहंस रोबो

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तलावाची निगा राखण्यासाठी सिंगापूरच्या प्रशासनाने एक नामी युक्ती केली आहे. तलावाचं पाणी स्वच्छ आहे की नाही, हे तपासण्यासाठी येथे पाच राजहंसांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे राजहंस खरे राजहंस नसून, ते चक्क रोबो आहेत. अगदी हुबेहूब राजहंसासारखे दिसणारे हे रोबो तलावात फिरत असतात आणि पाण्याची गुणवत्ता तपासतात.

सिंगापूर येथील वृत्तवाहिनी न्यूज एशियाने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरच्या प्रशासनाने तलावाची निगा राखण्यासाठी आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 'स्वान' (स्मार्ट वॉटर असेसमेंट नेटवर्क) हा प्रकल्प सुरू केला आहे. तलावाच्या वातावरणात चपखल बसतील यादृष्टीने या रोबोंची रचना करण्यात आली आहे. अतिशय संथगतीने राजहंसाच्या चालीप्रमाणेच हे रोबो पूर्ण तलावात फिरतात.

व्हिडिओ सौजन्य - Channel NewsAsia youtube

पाण्याचे नमुने तपासण्याचे यंत्र या रोबोला जोडण्यात आले आहे. वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय पाणी संस्था 'PUB' या तलावाची पाहणी करते. "हे रोबो स्वयंचलित असून, तलावातल्या बोटी आणि छोट्या पक्ष्यांपासून ते स्वतःच रक्षण करू शकतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: singapore is using robot swans to monitor water quality