esakal | नवीन फोन खरेदी करताय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Smart-Phone

नवीन फोन खरेदी करताय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकाच्या हातात फोन आलेला आहे. अनेकांकडे दोन फोन सुद्धा असतात. काही लोकांना सतत फोन बदलण्याची सवय असते. दोन ते तीन वर्षानंतर आपण फोन बदलत राहावा असे त्यांना वाटते. तर अनेकजण एकदाच चांगला फोन विकत घेण्याचा विचार करीत असतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी...

तुम्ही एकदाचा आणि चांगला फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. स्मार्टफोन खरेदी करताना ब्रँडच्याआधी स्पेसिफिकेशनबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. काही फीचर्स स्मार्टफोन्सला इतर फोनच्या तुलनेत अधिक दमदार बनवतात. स्मार्टफोन्स खरेदी करण्याआधी कोणत्या फीचर्सकडे अधिक लक्ष द्यायला हवे, ते जाणून घ्या...

हेही वाचा: अत्याचारानंतर ठार मारण्याची धमकी; नवविवाहितेची छेडखानी

बॅटरीकडे करू नका दुर्लक्ष

३००० एएचपासून ६००० एएचपर्यंत बॅटरी असणारे मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या मोबाईलच्या वापरावर आहे. ३००० एएच बॅटरी साधारण एक दिवस राहते. मात्र, अनेकांचा वापर जास्त असल्याने त्यांचे इतक्या बॅटरीत भागत नाही. म्हणून अधिक एएच बॅटरी असलेला मोबाईल खरेदी करा.

प्रोसेसरमध्येच सर्वकाही

मोबाईलमध्ये प्रोसेसर महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये दोन प्रोसेसर असतात. प्रोसेसर निवडताना तुमची गरज पाहून निवडावा. कमी किमतीत चांगले फिचर असलेला मोबाईल खरेदी करण्यापेक्षा लेटेस्ट प्रोसेसर असलेले मोबाईल खरेदी करण्याकडे भर द्या.

हेही वाचा: पितृपक्षही सेलिब्रेट करा; पंधरवड्यात वस्तू खरेदी करणे शुभच

रॅमकडे ठेवा लक्ष

रॅम हा मोबाईलमधला महत्त्वाचा घटक आहे. कमी रॅम असलेले मोबाईल कोणत्याही कामाचे नाही. फोटो आणि ॲप हेव्ही असल्यामुळे जास्त रॅम असलेले मोबाईल विकत घेतलेलेच बरे. सध्या ८ जीबी रॅम असणारे उत्तम दर्जाचे फोन बाजारात उपलब्ध आहेत. पण तुमचे बजेट कमी असेल तर ४ जीबी तही तुमचे काम चांगले चालू शकते.

तुमच्या गरजेनुसार स्टोरेज बघा

सध्या १२८ जीबी इनबिल्ड स्टोरेज असलेले मोबाईल उपलब्ध आहेत. मात्र, त्याशिवाय फोनमध्ये तुम्ही मेमरी कार्ड घालून २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. मोबाईलमध्ये जेवढा स्टोअरेज ठेवाल तेवढा फोन कमी हँग होईल. त्यामुळे तुम्ही कितीही मोठं स्टोअरेज असलेला मोबाईल घेतला तरीही तो अति भरला की हँग होतोच. त्यामुळे मोबाईलमध्ये काय ठेवायचे आणि काय नाही हे ठरवून घ्या.

हेही वाचा: फडणवीस सरकारच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊल

फोन हाताळण्याच्या पद्धतीवरून घ्या बिल्ड क्वालिटी

अनेकांची फोन वापरण्याची पद्धत अतिशय वाईट असते. फोन हाताळताना कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही. यामुळे मोबाईलच्या बिल्ड क्वालिटीकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे होऊन जाते. मोबाईलमध्ये बिल्ड क्वालिटीमध्ये दोन प्रकार येतात. एक प्लॅस्टिक बॉडी आणि दुसरी मेटल बॉडी. तुमच्या हातून फोन सतत पडणार असेल तर मेटल बॉडी असणारा फोन घेणे जास्त फायद्याचे ठरेल.

तुम्हाला किती हवा डिस्प्ले?

डिस्प्लेही मोबाईलमधला महत्त्वाचा भाग झाला आहे. लहान डिस्प्ले असलेले मोबाईल सहसा कोणी वापरत नाही. कारण, व्हिडिओ बघण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना मोठा डिस्प्ले असलेले मोबाईल हवे असते. ५.५ इंचाचा डिस्प्ले हातात बसण्याइतपत फोन वापरण्यासाठी पुरेसा असतो. अति मोठे डिस्प्ले असले की मोबाईल हातात मावत नाही, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

कॅमेरा आहे महत्‍त्वाचा

आता कॅमेऱ्याची जागा मोबाईल कॅमेऱ्यांनी घेतली आहे. प्रत्येकजण मोबाईलवरून फोटो काढताना दिसून येतो. यामुळे मोबाईलचा कॅमेरा चांगला असणे गरजेचे झाले आहे. यामुळेच ६४ मेगापिक्सेलपर्यंत कॅमेरा उपलब्ध आहेत. याशिवाय तीन कॅमेरा, चार कॅमेरा असलेले मोबाईलही बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जर व्हिडिओ शूटिंगसाठी मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल तर डकर आणि एकर सपोर्टीव्ह आहेत की नाही हे पाहायला हवं

loading image
go to top