Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

तुम्ही ॲपच्या कॅशे फाइल्स आणि डेटा हटवू शकता
Smart TV Tips
Smart TV Tipsesakal

Smart TV Tips :

टीव्ही पाहत असताना कधी-कधी सिग्नल जातो, तर कधी कधी इंटरनेट कनेक्शन निघून जाते.या किरकोळ गोष्टींसाठी टीव्ही ऑपरेटरला बोलवावे लागते. पण, अशावेळी काही टिप्स वापरून या गोष्टी दुरूस्त करता येऊ शकतात.  

काहीवेळा तुम्हाला सिग्नल नसणे, लॅगिंग परफॉर्मन्स, इंटरनेट कनेक्शन, ॲप क्रॅश आणि फ्रीझिंग अशा गोष्टी घडतात. स्मार्ट टीव्हीमध्ये सिग्नलची समस्या असल्यास ती तीन टप्प्यांत सोडवली जाऊ शकते.

टीव्हीचे केबल कनेक्शन तपासा

सर्वात आधी केबल कनेक्शन तपासणे महत्वाचे आहे. त्यानंतर सोर्स आणि इनपुट सेटिंग्ज अपडेट करा आणि शेवटच्या टप्प्यावर कनेक्ट केलेले डिव्हाइस आणि टीव्ही रीबूट करा. (Smart Tv)

Smart TV Tips
TV Open Cell: तुम्ही एलईडी टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? मग वेळ दवडू नका कारण...

जर तुम्हाला स्मार्ट टीव्हीमध्ये स्लो परफॉर्मन्सची समस्या येत असेल Cache आणि Cookies फाईल्स डिलिट करा. याशिवाय कमी महत्त्वाचे ॲप्स डिलीट करा.

नवे सॉफ्टवेअर अपडेट करा

जर तुम्हाला स्मार्ट टीव्हीवर इंटरनेट समस्या येत असतील, तर तुम्ही राउटर आणि मॉडेम रीस्टार्ट करू शकता. जर स्मार्ट टीव्हीला विशिष्ट ॲपमध्ये समस्या येत असेल. तर ॲप अपडेट करा. तुम्ही ॲपच्या Cache Files आणि डेटा हटवू शकता. तुम्ही ऍपच्या फॅक्टरी रीसेट ऑप्शनवर देखील जाऊ शकता.

Smart TV Tips
TV Open Cell: तुम्ही एलईडी टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? मग वेळ दवडू नका कारण...

ऑडिओ इश्यू

जर तुम्हाला स्मार्ट टीव्हीमध्ये ऑडिओ संबंधित समस्या येत असतील. तर टीव्ही आणि बाह्य डिव्हाइसची ऑडिओ सेटिंग्ज अपडेट करा. दोन्ही उपकरणांचे केबल कनेक्शन तपासणे महत्वाचे आहे.

काही वेळा स्मार्ट टीव्हीमध्ये काही चॅनेल शोधण्यात अडचण येते. तेव्हा आपण टीव्ही सेटिंग्जमध्ये जाऊन चॅनेल पुन्हा स्कॅन करू शकता. केबल आणि उपग्रह प्रदात्याचे चॅनेल पॅकेज तपासणे महत्वाचे आहे. जर चॅनल उपलब्ध नसेल तर तुम्ही कस्टमर सपोर्ट देखील घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com