स्मार्ट वॉलपेपर करणार घर प्रकाशमान

वृत्तसंस्था
Monday, 7 November 2016

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सरेमधील संशोधकांनी अतिशय पातळ आणि लवचिक सौर पॅनेल विकसित केले आहे. या सौर पॅनेलच्या साहाय्याने येत्या काही वर्षांमध्ये वातावरणातील प्रकाश आणि उष्णता शोषून घेऊन त्यांच्या मदतीने घराला ऊर्जा देऊ शकणारा स्मार्ट वॉलपेपर उपलब्ध केला जाईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

हा सौर पॅनेल पतंगाच्या डोळ्यांच्या रचनेपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आला आहे. मंद प्रकाशातही तो 90 टक्के कार्य क्षमतेने काम करू शकतो. संशोधकांनी ग्रॅफेन वापरून हा सौर पॅनेल तयार करण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी प्राणी अंधाराचा सामना कसा करतात, हे जाणून घेतले.

या वेळी डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे पतंग अतिशय अंधूक प्रकाशातही पाहू शकतात व ते त्यासाठी जास्तीत जास्त प्रकाश शोषत असल्याचे आढळले. संशोधकांनी याच रचनेचा वापर करून ग्रॅफेनचा समावेश असलेले पातळ सौर पॅनेल बनवले. या पॅनेलपासून वाया जाणारा प्रकाश किंवा उष्णता शोषणारा स्मार्ट वॉलपेपर विकसि त होऊ शकतो.

प्राध्यापक रवी सिल्वा म्हणाले,""भविष्यातील स्मार्ट वॉलपेपर किंवा स्मार्ट विंडोजच्या मदतीने वाया जाणाऱ्या प्रकाशापासून वीज निर्माण करता येऊ शकेल. ग्रॅफेनची विद्युत सुवाहकता अधिक असल्याने त्याचा वापर केला. सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा उगवत्या तंत्रज्ञानामध्ये या सौर पॅनेलचा वापर करणे हा आमच्यासाठी पुढील टप्पा असेल.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart wallpaper will light house