Smartphone Lifespan : तुमच्या मोबाईल फोनचं आयुष्य नेमकं किती आहे?

तुम्हाला नवीन फोन कधी घ्यायचा हे तुमचा फोन किती काळ टिकेल? यावर ठरतं
Smartphone Lifespan
Smartphone Lifespan esakal

Smartphone Lifespan : तुम्हाला नवीन फोन कधी घ्यायचा हे तुमचा फोन किती काळ टिकेल? यावर ठरतं. या बातमीत तुम्ही वाचू शकाल की मोबाईलचे सरासरी आयुष्य काय आहे.तुमचा फोन किती काळ चांगलं काम करेल? हा एक सामान्य प्रश्न आहे. तो किती काळ कार्यक्षमता राखू शकतो हे त्यावरून कळतं. फोनचे आयुष्य पूर्ण झाल्यावरच नवीन हँडसेट घेण्याचा निर्णय घेणे चांगले.

मोबाईलच्या सरासरी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक अहवालांनुसार, एक फोन सरासरी 2.5 वर्षे चांगले काम करू शकतो. मात्र, ब्रँड्सनुसार फोनचे आयुष्य बदलू शकते. उदाहरणार्थ, आयफोनचे आयुष्य सामान्यतः 4 ते 10 वर्षांपर्यंत असू शकते. आता प्रश्न पडतो की फोनचं आयुष्य संपलं आहे हे कसे कळणार.

Smartphone Lifespan
Health Care News: तुम्हाला खूप झोप येते का? तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

तुम्ही बराच काळ मोबाईल वापरत असाल तर हा फोन किती दिवस चालेल हे तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचे असेल. फोनचे आयुष्य संपले की फोनमध्ये काही समस्या येऊ लागतात. येथे आम्ही तुम्हाला अशा सामान्य समस्या सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की आता तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायला हवा.

Smartphone Lifespan
Health News : स्वाइन फ्लू बाधिताने स्पर्श केलेल्या वस्तूतून संसर्गाची भीती

या समस्या उद्भवल्यास, नवीन स्मार्टफोन खरेदी करा

स्मार्टफोन योग्यरित्या कार्य करणे महत्वाचे आहे. मात्र कालांतराने फोनमध्ये समस्या येऊ लागतात. आयुष्य संपल्यानंतर फोनमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येतात ते येथे पहा.

OS अपडेट केलेले नसेल तर:

जर तुम्ही स्मार्टफोनला नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर अपडेट करू शकत नसाल तर नवीन फोन खरेदी करणे चांगले. कारण तुमचा फोन नवीन अपडेटला सपोर्ट करू शकत नाही.

Smartphone Lifespan
Health Tips : जास्त लोणचे खाल तर दवाखान्यात जाल? पटत नसेल तर वाचा

बॅटरी लवकर संपते :

फोनची बॅटरी लवकर संपल्यानेही मोठी समस्या निर्माण होते. जर फोन जुना असेल आणि बॅटरीची समस्या असेल तर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करू शकता.

फोन अचानक बंद होणे:

फोन अचानक बंद झाल्यामुळे डोकेदुखी वाढते. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर फोन बदलायला हवा.

Smartphone Lifespan
Health Tips : जास्त लोणचे खाल तर दवाखान्यात जाल? पटत नसेल तर वाचा

कॉलवर ऐकू येत नाही:

फोनवर नेटवर्क देखील चांगले आहे परंतु फोनवर बोललेलं ऐकू येत नाही. फोन आला तर फोन करणाऱ्याचा आवाज ऐकू येत नाही. हे देखील एक लक्षण आहे की फोनचे आयुष्य संपले आहे आणि नवीन फोन खरेदी करण्याची गरज आहे.

Smartphone Lifespan
Health Care News : चहा-कॉफीमध्ये साखर टाळण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

स्टोरेज समस्या:

जेव्हा जेव्हा एखादा फोटो क्लिक केला जातो किंवा व्हिडिओ बनवला जातो तेव्हा स्टोरेज कमी असल्याची सूचना मिळते. फोनवर स्टोरेज नसेल तर फोनचा उपयोग काय? नवीन फोनमध्ये तुम्हाला साधारणपणे 64GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com