Smartphone Tips : फोन चार्जिंग करण्याची योग्य वेळ कोणती? याचं उत्तर तुम्हाला माहिती असायलाच हवं?

फोन चार्जिंगचे हे नियम तोंडपाठ करूनच ठेवा
Smartphone Tips
Smartphone Tips esakal

Smartphone Tips : फोन चार्जिंग करण्याची योग्य वेळ कोणती? तुम्ही म्हणाल हा काय बावळट प्रश्न आहे. फोनची बॅटरी संपली की आपण चार्जिंग करतो. किंवा कुठे बाहेर जाणार असलो तर मोबाईल आधी फुल करतो आणि मगच जातो.

तुम्ही असंच करत असाल ना? पण तुम्हाला माहितीय का हे चुकीचे आहे. तुम्ही असे केल्याने मोबाईल लवकर खराब होईल अन् तो तुमची साथ लवकर सोडेल. (Charging)

जेव्हा तुम्ही एखादा नवीन फोन खरेदी करता. तेव्हा नवा असताना त्याची बरीच काळजी घेतली जाते. थोडक्यात सांगायचं तर त्याला काय हवं नको ते पाहिलं जातं. त्याला वेळच्यावेळी चार्ज, क्लीन करतो. वेळीच फाईल्स डिलिट करतो. (Phone)

पण जेव्हा तो फोन जुना होतो तेव्हा आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. काही लोक आपला फोन जास्त चार्ज करतात, काही कमी, तर काही वारंवार चार्ज करतात. (Smartphone Tips : When should the smartphone be charged? More than 50% people make this mistake)

Smartphone Tips
Tech Hacks : फोनवर ठीकाय, पण लॅपटॉपवर कसा घ्याल स्क्रीनशॉट? एकदम सोपी आहे आयडिया, जाणून घ्या

यापैकी कोणतीही फार चांगली सवय नाही. जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते आणि कमी चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते. दिवसभरात वारंवार फोन चार्जवर ठेवणे ही वाईट सवय आहे. असे केल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे फोन योग्य प्रकारे चार्ज करणं गरजेचं आहे.

फोनची बॅटरी योग्य ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

- बॅटरी 20% वर आली असताना फोन वापरू नका

- बॅटरी पूर्णपणे संपवू नका

- फोनची बॅटरी 80% किंवा त्यापेक्षा कमी आणि 100% दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.

- फोन 100% चार्ज केल्यानंतर चार्जरपासून वेगळा करा, जेणेकरून फोन जास्त काळ 100% लेव्हलवर राहणार नाही.

Smartphone Tips
Tech Tips : फोनमधून लॅपटॉपमध्ये फोटो, व्हिडिओ ट्रान्सफर करण्याचा Best Formula

फोनची बॅटरी हेल्दी ठेवण्यासाठी 20-80 चा नियम पाळला जाऊ शकतो, ज्याचा सल्ला अनेकजण देतात. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी बराच काळ खराब होण्यापासून वाचते. म्हणजेच जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी २०% किंवा त्यापेक्षा कमी असेल. तेव्हा तुम्ही ती चार्जवर ठेवता आणि ८०% पर्यंत पोहोचल्यावर चार्जिंग काढून टाका.

जर तुमच्या फोनची बॅटरी दिवसातून दोनदा 20% पर्यंत पोहोचली तर तुम्हाला दोनदा चार्जिंग लावावं लागेल. आपण 45-75 नियम देखील फॉलो करू शकता. म्हणजेच जेव्हा फोनची बॅटरी 45% किंवा त्यापेक्षा कमी असेल तेव्हा तुम्ही ती चार्जवर ठेवू शकता.

जेव्हा ती 75% पर्यंत पोहोचेल तेव्हाच तुम्ही चार्जिंग काढून टाकू शकता. या पद्धतीमुळे फोनची बॅटरी जास्त काळ चांगली राहण्यास मदत होते.

सर्वसामान्यपणे प्रत्येकवेळी मोबाईलची बॅटरी 100 टक्के चार्जिंग करण्याऐवजी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करावी. तसेच चार्जिंगपूर्वी बॅटरी अधिक लो झालेली नाही ना याची खात्री करावी. बॅटरी लेव्हल 30 टक्क्यांपर्यंत येताच ती तातडीने चार्जिंगला लावावी. (Technology Tips)

Smartphone Tips
Smartphones In School : शालेय विद्यार्थ्यांच्या हाती दुधारी अस्त्र

या चूका टाळा

रात्रभर मोबाईल चार्जिंग करणे टाळा

जेव्हा बॅटरी 100 टक्के चार्ज होते, तेव्हा मोबाईल पार्टसचे नुकसान टाळण्यासाठी आपण स्मार्टफोन तातडीने अनप्लग करणे आवश्यक आहे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी चार्जिंगला लावलेला फोन सकाळी पूर्ण चार्ज झाल्यावरच अनप्लग केला जातो.

हे अगदी चुकीचे असून, असं कोणीही सांगण्यात आलेलं नाही. आता बहुतांश स्मार्टफोनमध्ये बॅटरी फुल चार्ज आहे, असे दर्शवले जाते, त्यामुळे अशा सवयी टाळणे महत्वाचे आहे.

स्मार्टफोन गरम होतोय?

स्मार्टफोन चार्जिंग होत असताना त्याचे तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नसावे. चार्जिंग सुरु असताना मोबाईल वापरणे हे योग्य असले तरी त्याचा अनावश्यक वापर टाळावा. चार्जिंग सुरु असताना फोनचा अनावश्यक वापर केल्यास तो प्रमाणापेक्षा अधिक गरम होतो. (Smartphone)

तसेच जेव्हा तुम्ही स्मार्टफोन चार्जिंगला लावता, तेव्हा त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र सूर्य किरणं येत नाहीत ना हे पाहणं देखील आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com