'स्नॅपडील'कडून मिळणार 'कॅश ऍट होम'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर चलनतुटवडा निर्माण झाल्याने वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने या निर्णयाला पाठिंबा देत "कॅशलेस' व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत आहेत. आता "स्नॅपडील'ने "कॅश ऍट होम' नावाची सुविधा आणली आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना पैसे घरपोच मिळणार आहेत.

"स्नॅपडील'ने "कॅश ऍट होम' योजनेद्वारे नागरिकांना घरपोच पैसे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे असे पैसे मिळविण्यासाठी "स्नॅपडील'वर कोणत्याही प्रकारची खरेदी करणे बंधनकारक नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या सेवेसाठी केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे. रोख रक्कम प्राप्त करण्यासाठी "स्नॅपडील'वर एक रुपया देऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर स्नॅनपडीशी करार असलेला कुरिअर एजन्सीचा प्रतिनधी "पीओएस' मशीन घेऊन तुमच्या दारात येईल. त्याच्याकडे तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड स्वॅप करावे लागेल. त्यानंतर तो प्रतिनिधी तुम्हाला रोख रक्‍कम देईल. या सुविधेमध्ये एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त दोन हजार रुपये मिळू शकतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snapdeal Cash at Home