Soccer Betting App Scam : चिनी व्यक्तीने गुजरातमध्ये उभारलं फुटबॉल बेटिंग अ‍ॅपचं जाळं; 9 दिवसांत लुटले 1,400 कोटी रुपये!

Betting App : या अ‍ॅपच्या जाळ्यात अडकून गुजरातमधील तब्बल 1,200 जणांचे पैसे लुटले गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
Soccer Betting App Scam
Soccer Betting App ScameSakal

गुजरात पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. फुटबॉल बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका चिनी व्यक्तीने तब्बल 1,400 कोटी रुपये लुटले असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार केवळ 9 दिवसांमध्ये घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या अ‍ॅपच्या जाळ्यात अडकून गुजरातमधील तब्बल 1,200 जणांचे पैसे लुटले गेल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर झालेला हा स्कॅम पाहता गुजरात पोलिसांनी तपासासाठी एका एसआयटीची स्थापना केली आहे.

Soccer Betting App Scam
Online Ticket Scam : ऑनलाईन तिकीट कॅन्सल करणे पडले महागात ; बसला ४ लाखांचा फटका

काय आहे प्रकरण?

गुन्हे अन्वेषण शाखेने याबाबत अधिक माहिती दिली. चीनमधील शेनझेन प्रांतात राहणारा वू उयानबे हा व्यक्ती या स्कॅमचा मास्टरमाईंड असल्याचं CID अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2022 साली जून महिन्यात याबाबत पहिल्यांदा माहिती समोर आली होती. "Dani Data" या अ‍ॅपच्या माध्यमातून गुजरात आणि यूपीमधील व्यक्तींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. याचे धागेदोरे उत्तर गुजरातमध्ये असल्याचं तपासात दिसून आलं होतं.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील हा व्यक्ती 2020 ते 2022 दरम्यान भारतात वास्तव्यास होता. या काळात त्याने कित्येक लोकांशी संपर्क साधून त्यांना पैसे कमावण्याचं आमिष देऊन आपल्या कटात सहभागी करून घेतलं. यानंतर 2022 च्या मे महिन्यात त्याने गुजरातमध्ये फुटबॉल बेटिंगचं अ‍ॅप लाँच केलं. (Tech News)

Soccer Betting App Scam
Online Gaming : भारतातील पैसा गुपचूप परदेशात पाठवतायत गेमिंग कंपन्या; टॅक्सचोरीसाठी होतोय क्रिप्टोकरन्सीचा वापर

भरपूर परतावा देण्याच्या आमिषाने कित्येक लोकांना या अ‍ॅपच्या जाळ्यात अडकवण्यात आलं. या माध्यमातून उयानबे हा दिवसाला 200 कोटी रुपये जमा करत होता. अशा प्रकारे 9 दिवस हे अ‍ॅप सुरू राहिलं. त्यानंतर अचानक हे अ‍ॅप बंद पडल्यानंतर लोकांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं.

वू उयानबे झाला पसार

2022 च्या ऑगस्ट महिन्यात गुजरात पोलिसांनी याचा तपास सुरू केला. मात्र, तपासामध्ये असं समजलं की उयानबे हा चीनला परत पळून गेला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेला उयानबे विरुद्ध ठोस पुरावा मिळू शकला नाही. त्यामुळे चीनमध्ये जाऊन पकडण्यासाठी पावलं उचलणं अद्याप शक्य झालं नाही.

Soccer Betting App Scam
Instagram Scam : इन्स्टावर सेलिब्रिटींचे फोटो लाईक करण्याची नोकरी; ठाण्यातील बेरोजगार तरुणाला घातला ३७ लाखांचा गंडा!

दरम्यान, उयानबे हा अजूनही चीन, हाँगकाँग, सिंगापूर अशा शेजारील देशांमधून अशा प्रकारचे रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं आहे. यासाठी तो विविध प्रकारच्या अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com