Social Media | व्हॉट्सअॅप, फेसबूक वापरण्यासाठी द्यावे लागणार शुल्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

Social Media : व्हॉट्सअॅप, फेसबूक वापरण्यासाठी द्यावे लागणार शुल्क

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपसह, वापरकर्त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सशुल्क फीचर्सचा पर्याय मिळणार आहे. याबाबत मेटा लवकरच मोठी घोषणा करू शकते.

कंपनी सध्या एक नवीन प्लान तयार करत आहे, ज्यामध्ये मेटा यूजर्स पैसे घेऊन काही खास फीचर्सचा पर्याय मिळवू शकतात. Twitter आणि Snapchat आधीच सशुल्क सेवा देतात, ज्यामध्ये हे प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना काही खास आणि विशेष वैशिष्ट्यांचा पर्याय देतात.

हेही वाचा: सोशल मीडियावर '१ हजार'साठी '1t'ऐवजी '1k' का लिहिले जाते ?

कंपनी सशुल्क वैशिष्ट्यांसाठी नवीन उत्पादन संस्था स्थापन करत आहे. मेटा, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या संस्थेच्या तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे उत्पादन नवीन आणि विशेष सशुल्क वैशिष्ट्यांवर काम करेल. संस्थेचे नेतृत्व प्रतिती रॉय चौधरी करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी META च्या संशोधन प्रमुख म्हणून काम केले आहे.

एका अहवालानुसार, मेटा New Monetization Experiences नावाचा एक नवीन विभाग तयार करत आहे, ज्याचे काम व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी काही विशेष वैशिष्ट्ये संशोधन आणि विकसित करणे आहे.

वास्तविक, पेड फीचर्सवर चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकवेळा कंपनीने पेड फीचर्सबाबत फीचर सुरू करण्याबाबत बोलले आहे. व्हॉट्सअॅपच्या बिझनेस अॅपसाठीही पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू करण्याबाबत बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा: आता बसल्या-बसल्या पंख्याचा वेग कमी-जास्त करा; या पंख्यावर जबरदस्त सूट

कॅमेरा शॉर्टकट बटण

अलीकडेच व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. WABetaInfo ने दावा केला होता की व्हॉट्सअॅप लवकरच कॅमेऱ्याच्या शॉर्टकट बारमध्ये सुधारणा करून मुख्य अॅपच्या इंटरफेसमध्ये कॅमेरा शॉर्टकट सादर करण्याची तयारी करत आहे. व्हॉट्सअॅप त्याचा यूजर इंटरफेस सुधारण्यासाठी सतत नवीन अपडेट्स जारी करत आहे.

Web Title: Social Media Fees To Be Paid For Using Whatsapp Facebook

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..