Solar AC : घरात बसवा सोलर एसी, वीज बिलाचं टेन्शन नाही

उन्हाळा सुरू होताच अनेक भागात वीजकपात
Solar AC
Solar ACesakal

Solar AC : उन्हाळा सुरू होताच अनेक भागात वीजकपात सुरु होते. लोडशेडिंगचा टाईम वाढू लागतात. अनेक ठिकाणच्या नागरिकांना लो व्होल्टेजच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात एसीसारखी उपकरणं चालणं कठीण होतं.

Solar AC
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

पण गर्मी खूप असल्याने एसीची गरजही खूप असते, अशा परिस्थितीत सोलार एसी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, सामान्य एसीपेक्षा सोलार एसी घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. पण ही एकवेळची गुंतवणूक आहे. सोलार एसी एकदाच लावावा लागतो. ज्यानंतर इलेक्ट्रीसिटीच्या टेन्शनपासून तुमची सुटका होईल.

वीज बिलापासून सुटका

सौरऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे आपलं वीज बिल मोठ्या प्रमाणात वाचतं. एकदा सोलार एसी बसवल्यानंतर, तुम्ही सुमारे २० ते २५ वर्षे वीजबिलाशिवाय एसी चालवू शकता.

Solar AC
Vaginal Health : उन्हाळ्यात योनीच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून खास टिप्स

अनेक प्रकारचे एसी मार्केटमध्ये

बाजारात अनेक प्रकारचे सोलार एसी उपलब्ध आहेत. हे AC ०.८ टन, १ टन आणि १.५ टन आणि २ टन क्षमतेचे आहेत. तसेच, सोलार एसी विंडो आणि स्प्लिट एसी अशा दोन्ही पर्यायांमध्ये येतात. अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या खोलीनुसार एसी निवडू शकतात.

Solar AC
Car Cooling Tips : कारचा एसी चालत नाहीये? या टिप्स करा फॉलो

उन्हाळ्यात एसी साधारणपणे दररोज १४-१५ तास चालतात. ज्यामुळे सुमारे २० युनिट्स लाईट्स वापरली जाते. तर ३० दिवस बघितले तर महिनाभर ६०० युनिट्स खर्च होतात. अशा परिस्थितीत एसीचाच एका महिन्याचा खर्च सुमारे साडेचार हजार रुपये होतो. सोलार एसीमुळे हे पैसे वाचू शकतात.

Solar AC
Foreign Travel: परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स

सोलार एसीची किंमत

आता सोलार एसीच्या किंमतीचा विचार केला तर १ टन सोलर एसीची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. याच १.५ टन सोलर एसीची किंमत २ लाख रुपये आहे. तथापि, वेगवेगळ्या ठिकाणी किंमतीत फरक दिसून येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com