सौर वादळाचा तडाखा; जीपीएस बंद पडणार?

सौर वारे आणि पृथ्वीचे वातावरण यांच्यात ऊर्जेची पुरेशी देवाण-घेवाण झाल्यास अशाप्रकारची वादळे निर्माण होतात.
Solar storm
Solar storm google

मुंबई : पुढील ४८ तासांत एक भूचुंबकीय वादळ पृथ्वीवर धडकणार असून त्यामुळे वीज जाऊ शकते. तसेच जीपीएस आणि रेडिओदेखील बंद होऊ शकतात. नासा आणि ‘राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन’ (National Oceanic and Atmospheric Administration - NOAA) यांच्या माहितीनुसार गुरुवारी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर वादळाचा प्रभाव पडण्यापूर्वी वेगवान सौर वाऱ्यांचा प्रवाह त्याला पुढे ढकलण्यास मदत करेल. यावेळी ते तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याचा परिणाम म्हणून उपग्रहांच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. अंतराळ हवामान भौतिकशास्त्रज्ञ तमिथा स्कोव्ह यांनी आज ट्विटरवर इशारा दिला. “नासा आणि NOAAने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे वादळ १४ एप्रिलला धडकणार आहे. सौर वारे मागून धक्का देत असल्याने हे वादळ तीव्र होण्याची शक्यता आहे”, असे त्यांनी लिहिले आहे.

रेडिओ पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कमी असली तरीही रात्रीच्या वेळी पृथ्वीवर रेडिओ आणि जीपीएसमध्ये अडथळे जाणवू शकतात. सौर वारे आणि पृथ्वीचे वातावरण यांच्यात ऊर्जेची पुरेशी देवाण-घेवाण झाल्यास अशाप्रकारची वादळे निर्माण होतात. अमेरिकेच्या अंतराळ हवामान विभागातर्फे या वादळांना त्यांच्या तीव्रतेनुसार जी १ ते जी ५ असे क्रमांक दिले जातात. १४ एप्रिलला येणारे वादळ हे जी २ दर्जाचे आहे.

SpaceWeather.comच्या माहितीनुसार सध्या सौर वारे ५१६.६ किमी प्रतिसेकंद या वेगाने वाहात आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार सौर वाऱ्यांची संख्या वाढत असून २०२५ पर्यंत सर्वोच्च प्रमाण गाठले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com