हिरव्या रंगाची काय आहे खासियत ? असा ठरु शकतो तुम्हाला हिरवा रंग फायदेशीर...

शिल्पा देगांवकर, कोल्हापूर.
Thursday, 18 June 2020

सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.

आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग - प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग आर्थिक घडामोडी, बॅंकिंगशी संबंधित तसेच त्या मध्ये healing power देखील आहे. गडद हिरवा महत्वाकांक्षा, लोभ आणि मत्सर तर पिवळसर हिरवा आजारपण, भ्याडपणा, विसंगती आणि मत्सर दर्शवू शकतो.ऑलिव्ह ग्रीन शांततेचा पारंपारिक रंग आहे. निळा आणि पिवळा मुख्य रंगाच्या मिश्रणाने बनलेला हिरवा शीत रंग (थंडावा देणार) आहे. लाल, पिवळा, निळा, केशरी,जांभळा, ग्रे, ब्राऊन ह्यापैकी कोणत्याही रंगाबरोबर हिरवा रंग उठून दिसतो.

हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू, अस्थिर, काहीशी आपल्याच मनाप्रमाणे वागणारी, आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी, प्रदर्शनप्रिय, निरपेक्ष प्रेम करणारी असतात दुसऱ्याला आणि स्वतःला क्षमा करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. दुसऱ्याचे मन संभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना "नाही" म्हणता येत नाही.

सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. विश्रांती मिळते, मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. हृदयाशी संबंधित कोणताही आजार जसे कि उच्च-निम्न रक्तदाब (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल, blockages, बाय-पास सर्जरी, रक्ताभिसरण संस्था ,फुफ्फुसांशी संबंधित विकार, श्वासोच्छवासाची समस्या, दमा, छातीत दुखणे,अकाली वृद्धत्व ह्या आजारात हिरव्या रंगाचा अधिक वापर हा आजाराची तीव्रता कमी करणारा आहे. हिरव्या पालेभाज्या,फळे दैनंदिन वापारात असलेल्या अधिकाधिक गोष्टी हिरव्या रंगात निवडाव्यात. करोना वायरसचा हल्ला हा सर्वप्रथम आणि श्वसन संस्था , फुफुसे ह्यावर होतोय आणि म्हणूनच इम्यून सिस्टम आणि श्वसनसंस्था strong करण्यासाठी आपण योगा प्राणायाम करतो आहोतच त्या बरोबर हिरवा रंग अधिक वापरणे हा एक प्रतिबंधक उपाय होऊ शकतो.

वाचा - आश्‍चर्य.... कसबा बीडला भांगलण करताना सापडली सोन्याची मुद्रा

जेंव्हा एखाद्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते, काही कारणास्तव दुरावा निर्माण होतो, एखादा आपल्याला दगा देतो तेंव्हा प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो ज्यामधून सावरणे अतिशय कठीण होते. ह्या परिस्थितीत मन:शांती, नवी आशा आणि आयुष्याची नवीन सुरुवात करायची असते तेंव्हा हिरव्या रंगाची healing power करते. निसर्गाचे निरीक्षण त्याच बरोबर वापरण्यात येणारी छोट्यातली छोटी गोष्ट उदा, रुमाल, छत्री,पेन,स्कार्फ, कंगवा नेलपेन्ट इत्यादी हिरव्या रंगाच्या शेड मध्ये निवडू शकतो. ज्यमुळे हिरव्या रंगाची vibrations सतत मिळतील आणि परिस्थितीतून बाहेर यायला मदत होईल समारंभात हिरव्या साडीला, लग्नात हिरव्या चुड्याला इतकं महत्व का दिले गेले असावे हे लक्षात आले असेल.

औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करताना सुरक्षितता दर्शविण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो. हिरवा रंग पर्यावरणसंबधी काम करणारी संस्था , बॅंकिंग, रिअल इस्टेट, Finance, Training Institutes, शेती व शेती संबंधीत व्यवसाय किंवा सेवा भावी संस्था यांच्या लोगो मध्ये हिरवा रंग असल्यास फायदेशीर. कोणत्या ही क्षेत्रात काम करणार्यांनी आर्थिक स्थैर्य, समृद्धी, व्यायसायवृद्धीसाठी आपल्या कार्यालयात हिरव्या रंगाचा वापर अधिक करावा. उदा. ऑफिस फाईल्स, भिंतींचा रंग, इंटिरिअर

थोडक्‍यात पाहिले तर हिरवा रंग आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांताता समृद्धी हा रंग देतो. जी आहे ती स्थिती उंचवतोय. मग हिरव्या रंगाकडून आपण काय शिकायचे ? मी आहे, माझे असणे, माझ्या विश्वात जे काही आहे ते आहे. त्याला अधिक चांगले कसे बनवायचे ह्यासाठी आपल्या परीने काम करत राहणे. हिरव्या रंगात रंगून I am here to make the world better हे अवलंबिणे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the specialty of green color useful