Strawberry Moon : ११ जूनला दिसणार ‘स्ट्रॉबेरी मून’; खगोलप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय
Astronomy News : ११ जून रोजी दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात 'स्ट्रॉबेरी मून' म्हटले जाते, मात्र त्याचा रंग स्ट्रॉबेरीसारखा नसतो. हे फक्त पारंपरिक नाव असून, जूनमध्ये अमेरिकेत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरी फळावरून ही संज्ञा आली आहे.
अमरावती : जून महिन्यातील शेवटची पौर्णिमा खगोलशास्त्रामध्ये ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणून ओळखली जाते. ११ जूनला पौर्णिमा आहे. सामान्यपणे जून महिन्यातील शेवटची पौर्णिमा पारंपरिक खगोलशास्त्राप्रमाणे स्ट्रॉबेरी मून म्हणून ओळखली जाते.