DNA Research : तुमच्या डीएनएमध्ये दडलंय डिप्रेशनचं रहस्य ; संशोधनातून समोर आलीये आश्चर्यकारक माहिती,जाणून घ्या

Psychiatric Disorder Research : जुन्या विषाणूंचे नेमके कार्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक : संशोधक
Ancient Viral Sequences in Human DNA Linked to Mental Health Issues
Ancient Viral Sequences in Human DNA Linked to Mental Health Issuesesakal

मानवी जनुकामध्ये आढळलेल्या जुन्या डीएनएमुळे Schizophrenia, bipolar disorder आणि डिप्रेशनसारख्या गंभीर मानसिक आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. किंग्स कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आपल्या डीएनएमध्ये सुमारे ८% भाग हा लाखो वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या विषाणूंच्या संसर्गाच्या अवशेषांपासून बनलेला असतो. या 'ह्युमन एंडो जिनस रेट्रोविरसेस' (HERVs) ला आतापर्यंत 'जंक डीएनए' म्हणून ओळखले जायचे, ज्याचा काही फायदा नाही. परंतु, नवीन संशोधनामुळे या जुन्या डीएनएचा मानसिक आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट झाला आहे.

Ancient Viral Sequences in Human DNA Linked to Mental Health Issues
Hormone Therapy : थायरॉईडच्या आजारावर हार्मोन थेरपी प्रभावी! काही डोसमध्ये व्हाल पूर्ण बरे,जाणून घ्या संपूर्ण माहिती

या संशोधनात मोठ्या प्रमाणात केलेल्या अभ्यासांचा समावेश होता. यामध्ये मानसिक आजार असलेल्या आणि नसलेल्या अनेक हजार लोकांचा सहभाग होता. तसेच, ८०० लोकांच्या मृत्यूनंतर घेतलेल्या मेंदूच्या नमुन्यांचीही माहिती यात वापरण्यात आली.

संशोधकांपैकी डॉ. टिमोथी पॉवेल यांच्या म्हणण्यानुसार, "हे जुन्या विषाणूंचे अवशेष मानवी मेंदूमध्ये कदाचित आधी समजलेल्यापेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात. विशिष्ट HERV आढळल्या जाणे आणि काही मानसिक आजारांचा धोका यांच्यात संबंध आढळला आहे."

Ancient Viral Sequences in Human DNA Linked to Mental Health Issues
Homemade Hair Mask : उन्हाळ्यात 'हे' ५ हेअर मास्क केसांना देतील पोषण!

दुसरे सह-संशोधक डॉ. डग्लस निक्सन यांनी सांगितले, "या जुन्या विषाणूंचे आणि मानसिक आजारांशी निगडित जनुकीय माहितीचे अधिक चांगले विश्लेषण केल्यास मानसिक आरोग्य संशोधनात क्रांती होऊ शकते. तसेच, या आजारांच्या निदान आणि उपचार पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणता येऊ शकतात."

जास्तीत जुन्या विषाणूंचे नेमके कार्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक असल्याचेही डॉ. निक्सन यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com