

भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळमोहिमेनंतर पृथ्वीवर परतत आहेत. त्यांचा हा प्रवास संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशस्वी मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष पत्र लिहिले असून त्यात त्यांच्यावरचा अभिमान व्यक्त केला आहे.