Sunroof Use : कारच्या बाहेर डोक्यावण्यासाठी नाही तर या कारणासाठी असतं सनरूफ

अनेकांना सनरूफची कार हवी असते, पण त्याचा योग्य वापर अनेकांना माहित नसतो.
Sunroof Use
Sunroof Useesakal

Sunroof In Cars : सध्या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सनरूफ फारच आकर्षित करतात. अनेक जण सनरूफच्या कार खरेदी करत आहेत. अशा कारमध्ये बहुतांशवेळा त्या सनरूफमधून डोकं बाहेर काढून हवेची मजा घेताना तुम्ही नेहमी पाहिलं असेल. अनेक महिला, मुलं तसं करतात आणि फोटो सेशनही करतात. पण हे सनरूफ त्याच कारणासाठी असतं का? खरंतर असं करणं फार धोक्याचं असतं. आणि सनरूफ त्या कारणासाठी दिलेलंही नसतं. मग नक्की काय आहे कारण...

Sunroof Use
Sedan Cars : देशातील सर्वात स्वस्त कार, कमी किंमतीत जबरदस्त मायलेज, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

नैसर्गिक सुर्यप्रकाश - सनरूफमधून कारमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश आत येतो. यासाठी सनरूफचा वापर करायला हवा. कारच्या विंडो मधून जास्त लाइट आत येत नाही. परंतु सनरूफ उघडल्यास जास्त लाइट आणि शुद्ध हवा कारमध्ये येते. यामुळे कारची केबिन जास्त ओपन वाटते. बंदिस्त फिलींग निघून जाते.

Sunroof Use
SUV Cars: घरासमोर थाटात उभी करा स्वतःची कार, १० लाखांच्या बजेटमधील 'या' आहेत बेस्ट एसयूव्ही

व्हेंटीलेशन - सनरुफच्या मदतीने कारच्या केबिनला लवकरच थंड करण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात कारच्या केबिनला थंड करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ज्यावेळी कार उन्हात पार्किंग केली जाते आतूनही फार गरम होते. त्यावेळी सनरूफ ओपन केल्यावर कारची गरम हवा लवकर बाहेर पडते.

इमरजेंसी एक्झिट - कोणत्याही इमरजेंसीच्या काळात कारचं सनरुफ इमरजेंसी एक्झिट म्हणून वापरता येऊ शकतं. त्यातून बाहेर पडता येऊ शकतं. दरवाजे उघडत नसतील तर सनरूफ बाहेर पडण्यासाठी वापरता येऊ शकतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com