आता घरबसल्या पाहता येईल न्यायालयाचे कामकाज, सुप्रीम कोर्टाने लाँच केले नवीन अ‍ॅप | Mobile App | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SC APP

Mobile App: आता घरबसल्या पाहता येईल न्यायालयाचे कामकाज, सुप्रीम कोर्टाने लाँच केले नवीन अ‍ॅप

SC Mobile App 2.0: सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मोबाइल अ‍ॅपचे नवीन अँड्राइड व्हर्जन २.० लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कायदेशीर अधिकारी आणि वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयांच्या नोडल अधिकाऱ्यांना न्यायालयाची कार्यवाही रियल टाइम पाहण्याची सुविधा मिळेल. या अ‍ॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. याचे आयओएस व्हर्जन पुढील आठवड्यात उपलब्ध होईल.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यावेळी बोलताना म्हणाले की, अ‍ॅपचे अँड्राइड व्हर्जन २.० उपलब्ध करण्यात आले आहे. तर पुढील एक आठवड्यात आयओएस व्हर्जन उपलब्ध केले जाईल. या अ‍ॅपद्वारे वकील व व त्यांच्याशी संबंधित रेकॉर्ड, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना रियल टाइममध्ये न्यायालयाचे कामकाज पाहता येईल. या अ‍ॅपमध्ये लॉग इन करून सहज प्रकरणांची माहिती घेता येईल. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोवरून मोफत डाउनलोड करू शकता.

याआधी बोलताना सीजेआय चंद्रचूड म्हणाले होते की, सरकारी वकील आणि अधिकाऱ्यांना सहज त्यांच्याशी संबंधित प्रकरणांची माहिती घेता येईल. तसेच, प्रकरणांची स्थिती, आदेश, निर्णय आणि प्रकरणं किती कालावधीसाठी प्रलंबित आहे याची माहिती मिळेल. नवीन अ‍ॅपमध्ये इतरही अनेक फीचर देण्यात आले आहेत, ज्याचा फायदा वकील व अधिकाऱ्यांना होईल.

हेही वाचा: Truecaller Features: सरकारी विभागाचे नंबर मिळवणं झालं सोप्पं; कुठे-कसे मिळतील जाणून घ्या

दरम्यान, करोना व्हायरस महामारीच्या काळात देखील सर्वोच्च न्यायालयाद्वारे सर्वसामान्यांना माहिती उपलब्ध व्हावी यासाठी देखील पावले उचलण्यात आली होती. मीडियाला न्यायालयीन कार्यवाही व्हर्च्यूअल पद्धतीने पाहता यावी, यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

टॅग्स :Supreme CourtApp