औषधाची वेळ सांगणारे सॉफ्टवेअर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल आणि क्षयरोग व फुप्फुसाच्या रोगांविरुद्ध लढा देणाऱ्या इंटरनॅशनल युनियनने क्षयरोग झालेल्या रुग्णांना वेळेवर औषधाची आठवण करण्या साठी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत क्षयरोग झालेल्या रुग्णांना एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारा औषध घेण्याची आठवण,तसेच समुपदेशनही केले जाणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले."

"क्षयरोगाचे रुग्ण थोडे बरे वाटायला लागल्यावर औषध घेणे बंद करतात, त्यामुळे या रुग्णांना रोज आठवण करून देण्यासाठी आम्ही हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे,''असे संसर्गजन्य विभागाच्या प्रमुख सुनीता रेड्डी यांनी सांगितले. रुग्णांबाबतची ही माहिती एक खास सॉफ्टवेअर ''नि:क्षय' या संकेतस्थळावर आपोआप अपलोड करेल. सध्या क्षयरोगासंदर्भात स्वयंचलित यंत्रणा अस्तित्वात नाही आणि या प्रकरणांचा पाठपुरावा करणारीही प्रणालीही नाही, त्यामुळे हे नवीन सॉफ्टवेअर या दोन्हीही अडचणी कमी करेल. क्षयरोगावरील प्रभावी उपचारातील यश 95 टक्के आहे,'' असे द युनियनचे प्रकल्प संचालक सरबजित चढ्ढा म्हणाले. या सॉफ्टवेअरची अपोलो रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येऊन त्याचा प्रतिसादही बघण्यात येणार आहे.

Web Title: Tablet software while saying