Tata Cars : टाटा कंपनीनं वाढवल्या कार्सच्या किंमती, नेक्सॉनसह या कार्स 1 मे पासून होणार महाग

टाटा मोटर्सने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे
Tata Cars
Tata Cars esakal

Tata Cars : टाटा मोटर्सने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 1 मे 2023 पासून कंपनीने आपल्या सर्व प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, त्यांच्या सर्व वाहनांच्या किमती व्हेरिएंट आणि मॉडेलनुसार सरासरी 0.6% वाढल्या आहेत.

Tata Cars
Marathi Tech Portal : सोलापूरच्या सूरज बागलांच्या ‘मराठी टेक पोर्टल’ची सातासमुद्रापार कीर्ती

अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात टाटाच्या नेक्सॉन, पंच, टियागो किंवा अल्ट्रॉज आणि इतर कार्स आणि एसयूव्ही खरेदी केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो, अन्यथा पुढील महिन्यापासून तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

म्हणून वाढल्या किंमती

टाटा मोटर्सने गेल्या फेब्रुवारीमध्येही आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, 1 एप्रिल 2023 पासून, कंपनीने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. आता 1 मे पासून टाटाच्या कार आणि एसयूव्हीच्या किमती पुन्हा वाढणार असून त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

Tata Cars
Peanut Health Benefits : पुरूषांसाठी Stamina Booster आहेत शेंगदाणे; या तीन पद्धतीने करा सेवन

टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की नियामक बदल आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या किमतीत किरकोळ वाढ केली जात आहे. 1 मे 2023 पासून टाटाची वाहने काही हजार रुपयांनी महागणार आहेत.

Tata Cars
Health Insurance Tips : Health Insurance मधील सब लिमिट म्हणजे काय आहे?

टाटाच्या 'या' आहेत फेव्हरेट कार्स

टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत पेट्रोल तसेच डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करते. हॅरियर आणि सफारी फक्त डिझेल इंजिन पर्यायात आहेत. तर, Tiago EV, Tigor EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max सारख्या इलेक्ट्रिक कार देखील लोकांच्या मनावर आजकाल जादू करत आहेत.

Tata Cars
Old Vs New Car Purchase : पहिली कार? जुनी खरेदी करावी की नवीन? या गोष्टींची घ्या काळजी...

नेक्सॉन आणि पंच सारख्या एसयूव्ही टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. त्याच वेळी, हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त टियागो तसेच प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ आहे. जर तुम्ही देखील नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यातच खरेदी करण्याची चांगली शक्यता आहे, अन्यथा पुढील महिन्यापासून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com