Tata Motors : टाटा मोटर्स सुसाट! प्रवासी वाहन उत्पादनात गाठला ५० लाखांचा टप्पा

tata motors crosses 5 million mark in passenger vehicle production
tata motors crosses 5 million mark in passenger vehicle production esakal

पुणे : टाटा मोटर्स या भारतातील अग्रगण्‍य ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज ५ दशलक्ष पॅसेंजर वेईकल्‍स उत्‍पादनाचा टप्‍पा गाठला. कंपनीने आज हा सुवर्ण टप्‍पा गाठल्याचा आनंद अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यासाठी टाटा कार्स व एसयूव्हींची न्‍यू फॉरेव्‍हर रेंज वापरून ५०-लाख फॉर्मेशन तयार करण्यात आले. इतकेच नाही तर महिनाभर कंपनीच्यावतीने हे यश साजरा केले जाणार आहे

टाटा मोटर्सने २००४ मध्‍ये १ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा संपादित केला, दुसरा दशलक्ष टप्‍पा २०१० मध्‍ये संपादित केला आणि २०१५ मध्‍ये ३ दशलक्ष उत्‍पादनाचा टप्‍पा गाठला, त्‍यानंतर २०२० मध्‍ये ४ दशलक्षावी कार लाँच केली. यामधून कंपनीचा प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ व वाढते ग्राहक संबंध दिसून येतात.

टाटा मोटर्सने जागतिक ऑटोमोटिव्‍ह उद्योगावर मोठा परिणाम झालेल्या कोविड-१९ काळ आणि सेमीकंडक्‍टर कमतरतेचे संकट अतसाना देखील तीन वर्षांच्‍या आत ४ दशलक्ष कार्स ते ५ दशलक्ष कार्सपर्यंतचा टप्‍पा गाठला.

हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Tata Motors
Tata Motors
tata motors crosses 5 million mark in passenger vehicle production
Sanjay Raut : फॉन टॅपिंगबाबत संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर..

दरम्यान ५-दशलक्ष उत्‍पादनाच्‍या टप्‍पा गाठल्याचा आनंद साजरा करण्‍यासाठी टाटा मोटर्स भारतातील ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उत्‍सव मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्सच्या डीलरशीप व विक्री आऊटलेट्सना ब्रॅण्‍डेड आऊटफिट्स व सिग्‍नेटरी चिन्‍हासह सजवले जाईल. कंपनी त्‍यांचे उत्‍पादन केंद्रे व प्रादेशिक कार्यालयांमध्‍ये महिनाभर हा आनंद उत्सव साजरा करेल.

tata motors crosses 5 million mark in passenger vehicle production
Pandharpur Maghi Yatra : पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

१९९८ पासून टाटा मोटर्सने काही प्रतिष्ठित ब्रॅण्‍ड्स सादर केले आहेत, जे मंदीच्‍या काळात देखील टिकून राहिले आहेत, आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात मोटरिंग लँडस्केपला आकार देण्यात अविभाज्य भूमिका बजावली आहे आणि अजूनही भारतातील अनेक घरांमध्ये लोकप्रिय ब्रँड ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com