Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Altroz

Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतात आपल्या प्रसिद्ध कारच्या XM व्हेरियंटची विक्री थांबवली आहे. हा कंपनीचा सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक कार आहे, ज्याचा भारतातील तीन सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रीमियम हॅचबॅकमध्ये देखील समावेश होतो. Altroz ​​चे हे बेस मॉडेल XE असून ज्याची किंमत 5.85 लाख रुपयांपासून सुरु होते. Altroz चे बेस मॉडेल ​​आणि XM मध्ये मोठा फरक होता, त्यानंतर कंपनीने XM बंद करून नवीन XE+ व्हेरियंट भारतात लॉन्च केला आहे.

काही फीचर्स केल कमी

नवीन Tata Altroz ​​XE+ च्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.35 लाख रुपये आहे जी डिझेल व्हेरियंटसाठी 7.55 लाख रुपयांपर्यंत जाते. किंमत आणखी कमी करण्यासाठी कंपनीने नवीन मॉडेलमधून सर्व अनावश्यक फीचर्स काढून टाकले आहेत. नवीन व्हेरियंटमध्ये 4-स्पीकर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एफएम, यूएसबी पोर्ट आणि फास्ट यूएसबी चार्जर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात 8.9 सेमी हरमन डॅशटॉप इन्फोटेनमेंट सिस्टम रिमोट कीलेस एंट्री, मॅन्युअल आणि ऑटोफोल्ड ORVMs, इलेक्ट्रिक टेंपरेचर कंट्रोल, फॉलो मी होम आणि फाइंड मी फंक्शन्स देखील मिळतात.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

नवीन व्हेरियंट इंजिन ऑप्शन्स

कंपनीने Altroz ​​च्या नवीन व्हेरियंटमध्ये पुर्वीसारखेच इंजिन ऑप्शन्स दिले आहेत ज्यात 1.2-लीटर रेवेट्रॉन पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड रेवेटोर्क डिझेल इंजिन दिले आहेत. कारचे पेट्रोल इंजिन 85 bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर डिझेल व्हेरियंट 89 bhp पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त, 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील दिले गेले आहे जे 108.5 bhp पॉवर आणि 140 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या दोन्ही इंजिनसह 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे, आतापर्यंत ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लॉन्च केलेली नाही. कारची उर्वरित सर्व फीचर्स आणि तंत्रज्ञान मागच्या Tata Altroz ​​प्रमाणेच आहे.

हेही वाचा: महिंद्राची कार खरेदीचा विचार करताय? कंपनी देतेय 'या' खास ऑफर

loading image
go to top