Tata Motors AC Cabin Truck : टाटा मोटर्सने आणले स्मार्ट ट्रक; एसी केबिन अन् हे 5 फीचर्स, एकदा बघाच

Tata Motors AC Cabin smart feature Truck :टाटा मोटर्सने त्यांच्या ट्रक्समध्ये एसी केबिन व स्मार्ट फीचर्सचा समावेश केला आहे. या अपग्रेडमुळे ट्रक चालकांना अधिक आरामदायी व सुरक्षित अनुभव मिळणार आहे.
Tata Motors AC Cabin smart feature Truck
Tata Motors AC Cabin smart feature Truckesakal
Updated on

Tata Motors Truck smart feature : टाटा मोटर्सने पुन्हा एकदा नवा मानदंड स्थापित केला आहे. देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने त्यांच्या SFC, LPT, अल्ट्रा, सिग्ना आणि प्राइमा ट्रक रेंजमध्ये एअर कंडिशन केबिन आणि स्मार्ट तंत्रज्ञानाची भर घातली आहे. या आधुनिक सुधारणा केवळ तांत्रिक नसून, चालकांच्या दैनंदिन अनुभवात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या ठरत आहेत.

एसी केबिन

टाटा मोटर्सच्या नव्या ट्रक केबिन आता परदेशातील लक्झरी ट्रक्ससारख्या वाटतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन एसी सिस्टममध्ये 'इको' आणि 'हेवी' असे दोन मोड आहेत, जे आवश्यकतेनुसार ऊर्जा वापर आणि कूलिंगची पातळी तयार करतात. हे सिस्टम फक्त थंडी नाही तर जलद आणि प्रभावी कूलिंग देतं, जे भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशात अत्यंत गरजेचे आहे.

शक्तिशाली इंजिन आणि स्मार्ट अलर्ट

नवीन ट्रक आता 320 हॉर्सपॉवर पर्यंत क्षमतेचे इंजिन घेऊन येत आहेत, जे अधिक भार सहजतेने वाहू शकतात. याशिवाय, इंजिन निष्क्रिय असताना आपोआप बंद होणारी प्रणाली, इंधन बचतीसाठी एक मोठा प्लस पॉईंट आहे. ट्रक ड्रायव्हरला रिअल टाइम व्हॉइस अलर्ट्स मिळतात, जे त्याला ड्रायव्हिंग दरम्यान सतर्क ठेवतात

Tata Motors AC Cabin smart feature Truck
Shubhanshu Shukla : लढाऊ वैमानिक ते अंतराळवीर! कोण आहेत भारताचे हिरो शुभांशु शुक्ला? थरारक प्रवास जाणून थक्क व्हाल..

"एसी केबिन आणि अपग्रेड केबिन हे ट्रक ड्रायव्हरच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे," असे टाटा मोटर्सचे कमर्शियल व्हेइकल्स विभागाचे प्रमुख राजेश कौल यांनी सांगितले.
ग्राहकांच्या फीडबॅकवर आधारित या अपग्रेड्समुळे केवळ ट्रक चालकच नव्हे तर ट्रक मालकांनाही मोठा फायदा होणार आहे उत्पादकता वाढ आणि मालकीचा एकूण खर्च कमी होणार आहे.

Tata Motors AC Cabin smart feature Truck
Motorola Edge 50 Discount : खुशखबर! 28 हजारचा मोबाईल मिळतोय 15 हजारांत; मोटोरोलाचा बंपर डिस्काउंट, इथे सुरुय ऑफर

टाटा मोटर्सने केवळ ट्रकच नव्हे तर सेवा नेटवर्क देखील मजबूत केले आहे. ३ हजारहून अधिक सेवा केंद्रे, रस्त्याच्या कडेला त्वरित मदत आणि Fleet Edge डिजिटल प्लॅटफॉर्म यामुळे ट्रक मालकांना देखभाल, ट्रॅकिंग आणि नियोजन करता येते तेही सहज आणि कार्यक्षमतेने.

टाटा मोटर्सच्या या नवनवीन सुधारणा भारतीय ट्रकिंग उद्योगात एक नवा अध्याय सुरू करत आहेत. चालकांचा सन्मान, आराम आणि सुरक्षितता यांना केंद्रस्थानी ठेवत कंपनीने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
हे ट्रक आता केवळ वाहतुकीचे साधन राहिले नाहीत, तर ते चालकांचा सहकारी आणि सुरक्षित जागा बनत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com