
Tata Nexon EV Vs MG ZS EV : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. यामुळेच लोक आता इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) वापर वाढवत आहेत. आज आपण Tata Nexon EV आणि MG ZS EV दोन्हींची तुलना पाहाणार आहेत. MG च्या ZS EV मध्ये, कंपनी 440 किमी च्या ड्रायव्हिंग रेंजचा दावा करते, तर Tata Nexon EV मध्ये तुम्हाला 312 किमी ची रेंज पाहायला मिळते. चला तर मग या दोघांपैकी कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट आहे ते पाहूया
MG ZS EV चे फीचर्स
MG ZS EV ही फीचर लोडेड कार आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, एक इनबिल्ट एअर प्युरिफायर, पॅनोरॅमिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 60:40 स्प्लिट रीअर सीट्स, 6 एअरबॅग, EBD सह ABS, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल (ESC) आणि हिल डिसेंट कंट्रोल दिले आहे.
पॉवरट्रेन
MG ZS EV 44.5kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे जी जास्तीत जास्त 143PS पॉवर आणि 353Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त 8.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेते.
चार्जिंग सिस्टम आणि वेळ
ZS EV कारची बॅटरी चा 0 वरून 100% पर्यंत चार्ज करण्यासाठी 6-8 तास लागतात. याव्यतिरिक्त, MG पोर्टेबल चार्जिंग सॉकेट देखील देते, जे कोणत्याही 15A पॉवर सॉकेटशी कनेक्ट केले जाऊ शकते. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 15 ते 16 तास लागतात. हे फास्ट चार्जिंग सिस्टमला देखील सपोर्ट करते आणि ZS EV 50kW DC फास्ट चार्जरसह 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 0 ते 80% पर्यंत फास्ट चार्ज केली जाऊ शकते.
MG ZS EV Excite आणि Exclusive या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. बेस एक्साइट व्हेरिएंटची किंमत 20.88 लाख रुपये आहे, तर एक्सक्लुझिव्ह ट्रिमची किंमत 23.58 लाख रुपये आहे.
Tata Nexon EV चे फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Nexon EV मध्ये तुम्हाला पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो फ्रंट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअर कंडिशन, ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग, व्हील कव्हर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, फॉग लाईट्स - फ्रंट असे फीचर्स मिळतात.
चार्जिंगची वेळ
Tata Nexon EV च्या चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला MG ZS EV पेक्षा जास्त चार्जिंग वेळ लागेल. ही कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात. तर फास्ट चार्जिंगसह, ती 60 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकते.
नेक्सॉन इव्हीचे इंजिन
Tata Nexon EV 1 इलेक्ट्रिक इंजिन ऑप्शनसह उपलब्ध आहे. ऑटोमॅटीक ट्रांसमिशन देखील उपलब्ध आहे. Nexon EV 5-सीटर आहे आणि त्याची लांबी 3993mm, रुंदी 1811mm आणि व्हीलबेस 2498mm आहे. ही इलेक्ट्रिक कार 127bhp पॉवर आणि 245Nm टॉर्क जनरेट करु शकते.
याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा इलेक्ट्रिक कार 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. Tata Nexon EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.