Tech Tips : फोन हरवलाय? चोरीला गेलाय? टेन्शन नॉट….या 5 टिप्समुळे होईल मदत!

सध्याच्या काळात मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग
Tech Tips
Tech Tips esakal

Tech Tips : सध्याच्या काळात मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर फक्त फोन करण्यासाठीच करत नाही, तर इतर कामांसाठीदेखील करतो. या कामांमध्ये शॉपिंग, फोटोग्राफी आणि बँकिंग या आणि अशाच आणखी काही गोष्टींचा समावेश असतो. अशा परिस्थितीत फोनमध्ये आपल्या पर्सनल माहितीच्या सोबतच बँक डिटेलही असतात. त्यामुळे आपला फोन चोरी झाल्यास आपल्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

Tech Tips
Budget Memes : बजेट सादर होण्यापूर्वीच ट्वीटरवर मीम्सचा पाऊस, पाहा Photos

या शिवाय चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन शोधणंही खूप कठीण आहे. मात्र, तुम्ही IMEI नंबरच्या मदतीने सरकारी पोर्टल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्रीला (CEIR) भेट देऊन तुमचं डिव्हाइस म्हणजेच फोन ब्लॉक करू शकता.

डेटा रिमोटली हटवा : बहुतेक वेळा आपल्याला फोनच्या किंमती पेक्षा त्यात असलेल्या डेटाची काळजी असते. पर्सनल डेटा चुकीच्या हातात गेला तर मोठं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत, डेटा रिमोटली हटविण हा एक चांगला पर्याय आहे. या केसमध्ये, आयफोन युजर्स iCloud.com वर जाऊन डिव्हाइस डेटा हटवू शकतात. तर Android युजर्स android.com/find वर ​​जाऊन हा डेटा हटवू शकतात.

Tech Tips
Travelling Tips : प्रेग्नेंसीत प्रवास करायचाय? या टिप्स फॉलो करा अन् बिंधास्त रहा!

फोन ट्रॅक करा

Android च्या Find My Device आणि iPhone च्या Find My iPhone फीचरद्वारे फोन ट्रॅक करणं खूप सोपं झालंय. पण फोन ऑनलाइन असताना त्याचं लोकेशन फक्त तुम्हीच पाहू शकाल. त्याचप्रमाणे फोन बंद केल्यावर फोनचं शेवटचं लोकेशन युजर्सना दिसतं.

तुमची बँकिंग इन्फर्मेशन प्रोटेक्ट करा

तसं तर बँकिंग अॅप्समध्ये सिक्युरिटी पिन आणि लॉक असतो. पण तरीही, सावधगिरी म्हणून तुमचे पासवर्ड बदला. किंवा संबंधित बँकांना फोन करून व्यवहार थांबविण्याबाबत सांगा.

Tech Tips
Railway Travel : भारतातील या ट्रेन्स आतून आहेत हॉटेलसारख्या पॉश

सोशल मीडियाचे पासवर्ड बदला

तुमचा फोन कोणाकडे आहे आणि ते त्याचं काय करतील सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे सोशल मीडिया पासवर्ड ताबडतोब बदला. अन्यथा कोणीही तुमच्या अकाऊंटवरून काहीही पोस्ट करू शकतो किंवा कोणालाही काहीही मॅसेज करू शकतो.

तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा

फोनमध्ये असलेल्या अकाउंटचे ओटीपी फक्त सिम कार्डवर येतात. अशा परिस्थितीत हे ओटीपी पासवर्ड चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास नुकसान होऊ शकतं. या प्रकरणात, नेटवर्क प्रोव्हाइडरला कॉल करा आणि शक्य तितक्या लवकर तुमचं सिम कार्ड ब्लॉक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com