

tech transparency project nudify apps report apple google play store ai deepfake nudity removals 2026 downloads revenue
esakal
वॉचडॉग संस्था 'टेक ट्रान्सपरन्सी प्रोजेक्ट' (TTP) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालात अॅपल आणि गुगल या दिग्गज कंपन्यांच्या अॅप स्टोअर्समधील मोठ्या सुरक्षेच्या त्रुटी उघड केल्या आहेत. या अहवालानुसार, अॅपलच्या अॅप स्टोअरवर ४७ आणि गुगल प्ले स्टोअरवर ५५ अशी एकूण १०० हून अधिक 'नडिफाय' (Nudify) अॅप्स बिनधास्तपणे उपलब्ध आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अॅप्सचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) कोणत्याही सामान्य फोटोला अश्लील किंवा नग्न स्वरूपात बदलले जाऊ शकते, जे लोकांच्या गोपनीयतेसाठी एक गंभीर धोका बनले आहे