esakal | सिमकार्डचा एक कोन का असतो तुटलेला? तुम्हाला माहितीये का 'हे' कारण
sakal

बोलून बातमी शोधा

sim card

सिमकार्डचा एक कोन का असतो तुटलेला?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

तुम्ही कुठल्याही कंपनीचा किंवा जगातला कोणताही भारी मोबाईल (mobile)खरेदी करा. पण, त्यात सिमकार्ड (sim-cards) घातल्याशिवाय त्या फोनला काही अर्थ नाही. सिमकार्ड असेल तरच तुमचा मोबाईल चालेल. तुम्ही इतरांशी संपर्क साधू शकता. त्यामुळे मोबाईलमध्ये सिमकार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. आज संख्य कंपन्यांचे सिमकार्ड बाजारात उपलब्ध आहेत. एकेकाळी बोटाच्या पेराएवढं मोठं असणार सिमकार्ड हळूहळू करत अगदी नखाएवढं लहान झालं. सिमकार्डच्या या रुपात बदल झाला. परंतु, त्यातली एक गोष्ट अजूनही चेंज झाली नाही ती म्हणजे त्याचा एका बाजुला तुटलेला कोन. कोणत्याही कंपनीचं सिमकार्ड घेतलं तरी ते कधीच संपूर्णपणे आयताकृती नसतं त्याचा एक कोन कायम तुटलेला असतो. परंतु, हे असं का असा विचार कधी तुम्ही केला आहे का? जर हा विचार केला नसेल किंवा तो एक कोन तुटलेला का असतो हे जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती नक्की वाचा. (tech-why-sim-cards-are-cut-from-the-corner-know-the-all-details)

सिमकार्ड पूर्णपणे आयताकृती नसण्याचं कारण आहे मोबाईल. ज्यावेळी मोबाईल तयार करण्यात आले त्यावेळी त्यात सिमकार्ड चेंज करण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे एखादं सिमकार्ड फोनमध्ये घातलं कि ते घट्ट बसून रहायचं आणि ते पटकन बाहेर काढता येत नसे. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात ज्या कंपनीचा फोन त्याच कंपनीचं सिमकार्डदेखील असायचं. त्यामुळे ज्या कंपनीचा फोन तुम्ही घ्याल त्याच कंपनीचं सिमकार्डही तुम्हाला खरेदी करावं लागत होतं. मात्र, कालांतराने तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड आणि मोबाईलमध्ये बदल घडत गेले. ज्यामुळे सिमकार्डचा एक कोन तुटलेला ठेवण्यात आला.

हेही वाचा: TET उत्तीर्ण असलेल्या 'त्या' ३१ हजार शिक्षकांना दिलासा

sim-card

sim-card

..म्हणून सिमकार्डचा एक कोन असतो तुटलेला

बदलत्या काळात तंत्रज्ञानासहित मोबाईल तंत्रज्ञानदेखील बदलत गेले आणि नवनवीन फोन बाजारात दाखल होऊ लागले. या नव्या फोन्समध्ये सिमकार्ड बाहेर काढण्याची आणि नवीन सिमकार्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु, सिमकार्ड संपूर्ण आयताकृती असल्यामुळे अनेकदा ते काढतांना किंवा फोनमध्ये टाकतांना तुटायचं. यात अनेकदा सिमकार्ड नीटदेखील बसत नव्हतं. त्यामुळे युजर्सला अनेक अडचणींना सामोरं जाव लागत होतं. याच कारणामुळे लोकांकडून वारंवार तक्रारी यायच्या. या तक्रारींचं निवारण करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी सिमकार्डच्या रचनेत म्हणजेच डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिमकार्डचा एक कोन तुटलेला ठेवण्यात आला. हा कोन तुटलेला असल्यामुळे सिमकार्ड फोनमधून काढणे सहज शक्य होतं.

दरम्यान, एक कोन तुटलेला असतांनादेखील अनेकांना सुरुवातीच्या काळात अडचणी आल्या. अनेक जण तुटलेला कोन चुकीच्या जागी बसवत होते. त्यामुळे ते सिमकार्डमध्ये फोनमध्ये नीट बसत नव्हतं. परंतु, कालांतराने प्रत्येकाला सिमकार्ड कशा पद्धतीने बसवावं याचं ज्ञान अवगत झालं.