esakal | टेक्नोहंट : उत्साह सणांचा, नव्या लॅपटॉपचा
sakal

बोलून बातमी शोधा

टेक्नोहंट : उत्साह सणांचा, नव्या लॅपटॉपचा

टेक्नोहंट : उत्साह सणांचा, नव्या लॅपटॉपचा

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

सणासुदीचे दिवस सुरू होताच विविध कंपन्यांकडून नवनवी गजेट्स सादर केली जात आहे. या गॅजेट्सवर भरघोस ऑफरही दिल्या जातात. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन एज्युकेशन, गेमिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेता नव्या लॅपटॉपची डील तुमच्यासाठी खास ठरू शकते. जाणून घेऊ या नव्याकोऱ्या लॅपटॉपबाबत...

गेमिंगची वाढती क्रेझ लक्षात घेता एसरने नुकताच प्रिडेटर सीरिजमध्ये ‘प्रिडेटर हेलिओज ३००’ हा नवाकोरा लॅपटॉप सादर केला. इंटेल कोअर आय-७ एच-सीरिजसह आलेला हा लॅपटॉप ४.६ गिगाहर्ट्स ऑक्टाकोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे. खास गेमिंगसाठी या लॅपटॉपमध्ये NVIDIA GeForce RTX 3070 GPU हे खास ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉपमध्ये टॉप-ऑफ-द-लाईन हार्डवेअरचा वापर केला आहे. 32GB पर्यंतची रॅम आणि 1 TB एक्सटर्नल स्टोअरेज आहे. ‘विन्डोज १०’ ऑपरेटिंग सिस्टिममधील या लॅपटॉपमध्ये फूल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे.

एसर प्रिडेटर हेलिओज 300

डिस्प्ले - १५.६ inch FHD IPS Display

प्रोसेसर - ११th Generation Intel Core Processor

ग्राफिक्स - NVIDIA GeForce RTX 3070 GPU

ऑ. सिस्टिम - Windows 10 Home

रॅम - ३२ GB

स्टोअरेज - १ TB

किंमत - १,२९,०००

एचपीने नुकताच ‘पॅव्हिलियन एअरो १३’ हा नोटबुक भारतात सादर करत केला. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्युकेशनचा प्रमाण वाढल्याने एचपीने या नोटबुक सिरीजमध्ये अडाप्टिव्ह बॅटरी ऑप्टिमायझर आणि मॉडर्न स्टँडबाय यांसारख्या प्रीमिअम वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. या नोटबुकच्या स्क्रीनमध्ये १६:१० अस्पेक्ट रेशो आणि १९२० x १०८० पिक्सल रिझोल्युशनमुळे स्क्रीनवर सूर्यप्रकाशातही काम करता येते. या नोटबुकमध्ये विन्डोज १० ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. हा लॅपटॉप ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी-रेशो असणारा पहिला पॅव्हिलियअन नोटबुक आहे.

एचपी पॅव्हेलियन एअरो 13

डिस्प्ले - १३.३" IPS Display

प्रोसेसर - AMD Ryzen ५ & ७ ५८००U Mobile Processor

ग्राफिक्स - AMD Redeon

ऑ. सिस्टिम - Windows १० Home

रॅम - १६ GB

स्टोअरेज - ५१२ GB

किंमत - ७९,९९९

रियलमीने भारतीय लॅपटॉप बाजारपेठेतही प्रवेश केला असून, पहिलावहिला लॅपटॉप - रिअलमी बुक स्लिम नुकताच सादर करण्यात आला. या लॅपटॉपचा डिस्प्ले १४ इंची २K QHD IPS असून २१६० x १४४० रिझोल्युशनमुळे हा लॅपटॉप वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. यात अत्याधुनिक ११th Gen Intel® Core प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसरच्या मदतीने लॅपटॉपवरील कुठलेही काम, म्हणजे गेमिंग, प्रॉडक्शन, कार्यालयीन कामकाज किंवा गेमिंगमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळतो. खास गेमिंगसाठी Intel® Iris® Xe Graphics कार्ड दिल्याने गेमिंगचा आनंद द्विगुणित होतो.

रिअलमी बुक स्लिम

डिस्प्ले - १४" २K QHD, IPS LCD Display

प्रोसेसर - ११th Gen Intel® Core

ग्राफिक्स - Intel® Iris® Xe Graphics

ऑ. सिस्टिम - Windows १० Home

रॅम - ८ GB

स्टोअरेज - २५६ GB

किंमत - ४६,९९९

loading image
go to top