
गलच्या ईमेल सेवा असलेल्या जीमेलमध्ये (Gmail)फक्त १५ जीबी स्टोरोज दिले जाते.
औरंगाबाद - गुगलच्या ईमेल सेवा असलेल्या जीमेलमध्ये (Gmail)फक्त १५ जीबी स्टोरोज दिले जाते. जीमेल अकाऊंटचा वापर पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही प्रकारे केला जातो. या कारणामुळे त्याचे स्टोरेज थोड्या वेळेत फुल होऊन जाते. तुम्हीही याकडे लक्ष द्यावे. जर स्टोरेज फुल झाले तर तुम्ही मेल पाठवू शकणार नाहीत. तसेच इतरांचे मेलही मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वेळेवर जीमेल अकाऊंट क्लिन करत चला.
असा वाचवा पैसा
जीमेल अकाऊंटचे स्टोरेज संपल्यावर तुम्हाला जर वाटले तर गुगलकडून अतिरिक्त स्टोरेज खरेदी करु शकता. गुगल १०० जीबी स्टोरेजसाठी १३० रुपये महिना चार्ज घेते. मात्र आम्ही तुम्हाला स्टोरेज क्लिन करण्याचाच सल्ला देऊ. तर चला जाणून घेऊ या कसा प्रकारे क्लिन करता येईल जीमेल अकाऊंट आणि वाचवता येतील पैसे..
गुगल ड्राईव्हमध्ये साईजनुसार डिलीट करा फाईल्स
- डेस्कटाॅपवर drive.google.com/#quote ही लिंक ओपन करा.
- तुमचे जीमेल अकाऊंट लाॅग इन करा
- येथे तुमचे सर्व फाईल्स साईजनुसार मिळून जातील.
- तुम्हाला गरजेचे नसलेले फाईल्स डिलिट करा.
जीमेलमधून असे हटावा मोठ्या आकाराचे ईमेल
-Gmail.com वर जा आणि तुमचे गुगल अकाऊंट लाॅगिन करा
-सर्च बारमध्ये टाईप करा has:attacment larger:10M
- यामुळे १०० एमबीपेक्षा जास्त ईमेल येतील.
- जी तुम्हाला आवश्यक नाहीत अशी इमेल सिलेक्ट करुन डिलिट करा
- आता ट्राशवर जावे आणि आपले अकाऊंट क्लिन करण्यासाठी एम्पिटी ट्रश बटन टॅप करा.
- आता स्पॅम फोल्डरवर जा आणि डिलिट ऑल स्पॅम मॅसेज नाऊवर क्लिक करुन कर्न्फम करा.
संपादन - गणेश पिटेकर