Google Meet वापरायला जमत नाही! मग या टेप्सप्रमाणे शिका लवकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Meet Marathi News

गुगल मीटचे फ्री व्हर्जन वापरण्यासाठी तुम्हाला वेब, आयओएस या अँड्राॅईड अॅप्सवर ओपन करावे लागेल. जाणून घ्या कसा त्याचा वापर करावा

Google Meet वापरायला जमत नाही! मग या टेप्सप्रमाणे शिका लवकर

लाॅकडाऊनच्या काळात तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुगल मीटवरुन ऑफिसची कामे केली असतील. शाळा किंवा महाविद्यालयांची ऑनलाईन वर्ग गुगल मीटवरुन झाली होती. आताही ती सुरुच आहेत. गुगल मीट या सेवेच्या माध्यमातून व्हिडिओ काँफ्रन्सिंग केले जात होते. पूर्वी याला गुगल हँगआऊट्स मीट या नावाने ओळखले जात होते. गुगल मीट युजर्सला अनेक सुविधा देते.


गुगल मीट ही मोफत सेवा आहे?
तसे गुगल मीट सर्वांसाठी एक मोफत सेवा आहे. फ्री युजर्ससाठी यात मीटिंगचा कालावधी एक तास आहे आणि त्यात १०० युजर्स एकावेळी समावून घेऊ शकता. जी सूट युजर्ससाठी या सुविधा वाढतात. मीटिंगचा कालावधी ३०० तास होतो आणि १५० युजर्स देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय काॅल, चोवीस तास कस्टमर सपोर्ट मिळतो. जी सूट एंटप्रायजेसच्या युजर्सला ३०० तासांचा अवधी मिटिंगसाठी आणि २५० युजर्स सहभागी करुन घेऊ शकतो. या व्यतिरिक्त इंटेलिजेंट जाॅईन कँसलेशन, सेव्हिंग मीटिंग, रेकाॅर्डिंग्स टू गुगल ड्रायव्ह आणि होस्ट ऑफ सिक्युरिटी  फीचर्सही आहेत. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात गुगलने व्हिडिओ काँफ्रन्सिंग सर्व्हिस गुगल मीट फ्री मध्ये दिली जात आहे. सुरुवातीला ही सर्व्हिस केवळ जी सूट वापरकर्त्यांना मिळत होती. गुगल मीटमध्ये शेड्यूलिंग, स्क्रिन शेअरिंग आणि रिअल टाईम कॅप्शनिंग सारख्या फिचर्स मिळतात. जर तुम्ही गुगल मीटचे व्हर्जन वापर इच्छिता तर यासाठी तुम्हाला एक फ्री गुगल अकाऊंट  बनवावे लागेल. व्हिडिओ काॅलसाठी ६० मिनिटांपर्यंत  मर्यादा आहे. मात्र आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला गुगल मीटचे मोफत एडिशन सुरु केले आहे. तुम्ही वेबवर व्हिडिओ चॅट सेवाचा उपयोग meet.Pl.com आणि आयओएस या अँड्राईडच्या मोबाईल अॅपवर करु शकता. गुगल मीटचे फ्री व्हर्जन वापरण्यासाठी तुम्हाला meet.google.com किंवा फक्त ios आणि Android च्या मोबाईल अॅप्सवर वापरु शकता.


गुगल मीटचा मोफत वापर कसा करावा?
प्रथम तुम्हाला साईन अप करावे लागेल. यासाठी युजर्सला गुगल मीटवर जावे लागेल. येथे युजर्सला गुगल मीट सर्व्हिससाठी सर्वप्रथम स्वतःचे नाव, ई मेल, देश आणि प्रायमिरी युज ( पर्सनल, बिझनेस, एज्युकेशन आणि सरकारी सर्व्हिससाठी) नोंदवावी लागेल. त्यानंतर युजरला गुगलच्या अटी मान्य कराव्या लागतील आणि सब्मिट या बटणावर क्लिक करावे लागेल. आता युजरला साईन अप करावे लागेल आणि त्यानंतर गुगल मीट  फ्री व्हर्जनचा वापर करावे लागेल. सर्वप्रथम युजरला  आपल्या आयओएस  किंवा अँड्राईड अॅप किंवा meet.google.com वर जावे किंवा  गुगल कँलेंडरमध्ये जाऊन मीटिंग सुरु करावे लागेल, आता नवीन मीटिंग सुरु करावे किंवा आपला मीटिंग कोड नोंदवावा. आता या गुगल अकाऊंटची निवड करावी. ज्याचा तुम्ही वापरू इच्छिता. आता ज्वाईन मीटिंगवर क्लिक करा. या व्यतिरिक्त तुम्हाला या मीटिंगमध्ये इतरांनाही सहभागी करुन घेता येते.
 

Edited - Ganesh Pitekar

टॅग्स :Share Market