esakal | काॅम्प्युटर असो लॅपटाॅप, विंडोज १० वापरासाठी काही सोपे टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Windos10 News

तुम्ही लॅपटाॅप किंवा काॅम्युटर वापरत असाल तर काही असे टीप्स आणि ट्रिक्सविषयी आपल्याला माहिती नसते. हे टीप्स कोणत्याही व्यक्तिला कामाला येऊ शकतात.

काॅम्प्युटर असो लॅपटाॅप, विंडोज १० वापरासाठी काही सोपे टीप्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - आपण सर्व विंडोज पीसीचा वापर करतो. जर पर्सनल काॅम्प्युटरचा विषय घेतल्यास मायक्रोसाॅफ्ट विंडोज-१० चा हिस्सा जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या स्थितीत स्पष्ट आहे, की विंडोज-१० लोकांमध्ये फार लोकप्रिय आहे. तुम्ही लॅपटाॅप किंवा काॅम्युटर वापर करत असाल तर काही असे टीप्स आणि ट्रिक्सविषयी आपल्याला माहिती नसते. हे टीप्स कोणत्याही व्यक्तिला कामाला येऊ शकतात, तर जाणून घेऊ..

जेस्चर्स - विंडोज-१० मध्ये टच जेस्चरची कमतरता नाही. यात अनेक प्रकारचे कस्टमाईज जेस्चर कमांड दिली गेली आहेत. यासाठी तुम्हाला पीसी किंवा लॅपटाॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर डिव्हाईसवर जा. नंतर तुम्हाला लेफ्ट साईडवर टचपॅड दिसेल. यावर क्लिक करा आणि पुन्हा राईट साईडमध्ये तुम्हाला ३ तीन फिंगर जेस्चर आणि चार फिंगर जेस्चरचा पर्याय दिसेल. येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्वाईप अँड टॅपची निवड करु शकता.

इमोजी
हे केवळ स्मार्टफोनवरच नाही तर काॅम्प्युटर किंवा लॅपटाॅपवरही बनवले जाऊ शकतात. काॅम्प्युटर की बोर्डाच्या माध्यमातून ती बनवली जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला विंडोज की आणि फुल स्टाॅप की ला दाबावे लागणार आहे. पुन्हा तुमच्या समोर स्क्रीन ओपन होईल ज्यात इमोजी दिले गेले असेल. तुम्ही माऊसच्या मदतीने यातील कोणतेही इमोजी निवडू शकता.

काॅपी पेस्ट
हे तर सर्वांना जमत असेल. जर तुम्हाला हे येत नसेल तर आता तुम्हाला विंडोज-१० क्लिपबोर्ड हिस्ट्री फीचरचा वापर करु शकता. त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व काॅपी आयटम्सला एकावेळी एकाच ठिकाणी स्टोर करु शकता. ते विंडोजमध्ये अगोदर नसतात. यासाठी तुम्हाला विंडोजबरोबर 'व्ही' की दाबावे लागेल. यानंतर तुमच्या समोर क्लिपबोर्ड हिस्ट्री ओपन होईल आणि तुम्ही हे सेट करु शकता. या नंतर तुम्ही सर्व काॅपी केलेले आयटम्स क्लिपबोर्ड हिस्ट्रीत दिसू लागतात. ती डबल क्लिक करुन वापरु ही शकता.

फोकस असिस्ट
विंडोज-१० मध्ये एक फोकस असिस्ट फीचरही असते. ते डू नाॅट डिस्टर्ब सारखे असते. ते ऑन केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळणार नाही. येथे तुम्हाला तीन पर्याय असतील. ज्यात टर्न ऑफ, प्रायोरिटी मोड आणि मोडचा समावेश आहे. तुम्ही ते आपल्या सोयीनुसार सेट करु शकता.

वायफाय कनेक्शन - आज विंडोज-१० मध्ये वाय-फायच्या मदतीने कोणाशीही शेअर करु शकता. तुम्ही आपल्या विंडोज १० चे इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने दुसऱ्या डिव्हाईसला कनेक्ट करु शकता. यासाठी तुम्हाला नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय ऑन करावा लागेल.

सुपीरियर साऊंड आऊटपुट - या फीचरच्या साहाय्याने जेव्हा ही तुम्ही तुमचे विंडोज १० मध्ये चित्रपट पाहात असाल, गेम्स खेळत असाल किंवा हेडफोनचा वापर करत असाल तर तुम्हाला साऊंड सेटिंगमध्ये जाऊन स्पाशल ऑडिओ सेटिंगवर क्लिक करावे लागेल. येथे त्यास ऑन करा. तुमच्या काॅम्पुटरमध्ये डाॅल्बी एक्सेस असेल तर तुम्ही डीटीएस ऑडिओचा वापरही करु शकता.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top