स्मार्टफोनला सहज बदला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, ही आहेत काही टीप्स

2mobile_9.jpg
2mobile_9.jpg
Updated on

औरंगाबाद : जर तुमच्याकडे काही जुने फोन असतील आणि ड्राॅवरमध्ये धूळखात पडून आहेत, तर तुम्ही ती विकू नका. तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने आणि सर्वात अनोख्या पद्धतीने वापर करु शकता. तुम्ही तुमची जुनी फोन्स एक सिक्युरिटी कॅमेऱ्याप्रमाणे वापर करु शकता. तुम्ही एक फोन बेबी माॅनिटरप्रमाणे वापरु शकता. येथे काही सर्वांत चांगल्या आयडिया, ज्यांचा वापर करुन तुम्ही आपला जुन्या फोनला नवीन रुप देऊ शकता.

तुमच्या जुन्या फोनमध्ये एक सिक्युरिटी कॅमेरा अॅप डाऊनलोड
सुरवातीला तुम्हाला तुमच्या जुन्या फोनमध्ये एक सिक्युरिटी कॅमेरा अॅपची निवड करावी लागेल. अनेक अॅप्समध्ये तुम्हाला एकसारखे फीचर्स मिळू शकतात. जसे की यात तुम्हाला लोकल स्ट्रीमिंग, क्लाऊड ट्रिमिंग, रेकाॅर्डिंग मिळते. या व्यतिरिक्त तुम्हाला फुटेजला रिमोटली किंवा लोकली स्टोर करण्याची सुविधाही मिळते. या व्यतिरिक्त मोशन डिटेक्शन आणि अर्ल्टही तुम्हाला मिळते. एकदा सेटअप झाल्यावर तुम्ही तुमचे घर कुठल्याही ठिकाणाहून सिक्युरिटी कॅमेरे कंट्रोल करु शकता. असे तुम्ही आपल्या नवीन फोनच्या मदतीने करु शकता. सर्वांत चांगला पर्याय म्हणजे तुमच्या फोनला एक सिक्युरिटी कॅमेरा म्हणजे अल्फ्रेडप्रमाणे वापर करा. हे एक क्राॅस प्लॅटफाॅर्म आहे. याचा अर्थ असा की त्याचा काही फरक पडत नाही. तुमचा जुना फोन एक अँड्राईड फोन आहे किंवा आयओएस आधारित अॅपलचा आय-फोन आहे. असच काही तुम्ही तुमच्या नवीन फोनबरोबर करु शकता. अल्फ्रेड फ्री आहे आणि तुम्हाला लाईव्ह फीडचा रिमोट व्ह्यू देऊ करतो. या व्यतिरिक्त तुम्हाला मोशन डिटेक्शनही मिळते. तसेच अलर्ट्सही मिळते. तुम्हाला फ्री क्लाऊड स्टोरेज मिळते. या व्यतिरिक्तही तुम्हाला टु-वे ऑडिओ फीडही मिळते. असे यामुळे की ते फ्रंट आणि रिअर कॅमेरा दोन्हींच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळते.

काय करावे?
- सर्वप्रथम अँड्राईड किंवा आयओएस स्टोरेजवर जाऊन अल्फ्रेड अॅप तुमच्या नवीन किंवा जुन्या दोन्ही फोनमध्ये डाऊनलोड करा. असे तुम्ही आपल्या जुन्या किंवा नवीन टॅब्लेटवरही करु शकता.
-यानंतर तुम्हाला स्टार्ट बटन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला व्ह्यूअर मिळणार आहे. ते सिलेक्ट करुन पुढे जा.
- आता तुम्हाला येथे साईन इन करायला सांगितले जाईल. तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटवरुन ते साईन इन करु शकता. तुम्हाला येथे गुगल अकाऊंटची गरज भासणार आहे.
- तुम्हाला तुमच्या जुन्या फोनमध्ये असेच काहीतरी करावे लागणार आहे. मात्र जुन्या फोनमध्ये तुम्हाला व्ह्यूअरच्या ठिकाणी कॅमेरा सिलेक्ट करावे लागणार आहे. यानंतर तुम्हालाही हे ठरवावे लागेल की दोन्ही फोनमध्ये एकाच अकाऊंटमध्ये तुम्हाला साईन इन करायचे आहे.

आता तुमचा सेटअप पूर्ण झाले असून तुम्हाला तुमच्या फोनला तुमच्या घरात योग्य ठिकाणी लावायचे आहे. त्यानंतर तुम्हाला योग्य माहिती इतर फोनवर मिळत राहणार नाही.  

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com