Technology Tips : सेल्फ ड्राईव्ह कारमध्ये बसलेले बिल गेट्स म्हणाले हा तर कॉम्प्युटर गेम

भविष्याकडे क्लिअर व्हिजन ठेवणाऱ्या बिल गेट्स यांना गाड्यांचा भारी शौक
Technology Tips
Technology Tips esakal

Technology Tips : भविष्याकडे क्लिअर व्हिजन ठेवणाऱ्या बिल गेट्स यांना गाड्यांचा भारी शौक आहे. अलीकडेच बिल गेट्स यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लंडनच्या रस्त्यावर सैर करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांना हा सैरसपाटा घडवला आहे सेल्फ-ड्रायव्हिंग कारने. यावेळी ते म्हणाले की, ऑटोनॉमस व्हेइकल्स (एव्ही) हे भविष्य आहे.

Technology Tips
Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

खरं तर, गेल्या आठवड्यात बिल गेट्स यांनी 'हँड्स ऑफ द व्हील' टायटल असलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये वेव्हच्या (Wayve) वाहनाविषयीचा अनुभव शेअर केला. बिल गेट्स यांनी संस्थापक-सीईओ अॅलेक्स केंडल आणि सुरक्षा ऑपरेटर यांच्यासोबत हा अनुभव घेतला. त्यांनी सांगितले की कार अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे. एव्हीने लंडनच्या गजबजलेल्या रस्त्यांवर नेव्हिगेट केल्यामुळे बिल गेट्स यांनी हा अनुभव 'संस्मरणीय आणि उत्साहवर्धक' असल्याचं वर्णन केलं आहे.

Technology Tips
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, वेव्ह सेल्फ-ड्रायव्हिंगच्या नवीन दृष्टिकोनावर काम करत आहे. एक तंत्रज्ञान जे पुढील 10 वर्षांत 'टिपिंग पॉइंट' ठरेल. गेट्स म्हणाले की सेल्फ ड्रायव्हिंग पूर्णपणे गेम सारखं असेल. .

Technology Tips
Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

एव्ही कदाचित इलेक्ट्रिक आणि सामान्य कारपेक्षा चांगली आहे... - बिल गेट्स

यूट्यूबवर सेल्फ-ड्रायव्हिंग अनुभवाचा व्हिडिओ पोस्ट करत बिल गेट्सने लिहितात की, एव्ही बहुधा इलेक्ट्रिक आणि सामान्य कारपेक्षा स्वस्त असेल. हा पर्यावरणास अनुकूल पर्याय असेल ज्यामुळे लोकांना अधिक वेळ मिळेल आणि अपंग आणि वृद्धांच्या वाहतुकीत मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com