इलेक्ट्रिक बाइक फक्त 12 रुपयांत 60 किमी धावणार

techo electra
techo electra

नवी दिल्ली - पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सध्या लोक इलेक्ट्रिक वाहनं घेण्याकडे वळत आहेत. अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची तयारी करत आहेत. आता Techo Electra नवीन इलेक्ट्रिक मोपेड बाजारात उतरवणार असून Techo Electra Saathi असं गाडीचं नाव आहे. कंपनीच्या वेबसाइटवर इलेक्ट्रिक मोपेड बुक करता येणार आहे. Techo Electra Saathi ची डिलिव्हरी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. 

टको इलेक्ट्रा कंपनीने दावा केला आहे की, साथी मोपेड एकदा चार्जिंग केल्यानंतर जवळपास 60 ते 70 किमीपर्यंत जाऊ शकते. यामध्ये बीएलडीसी मोटर आणि 48 व्होल्ट Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीशिवाय मोपेडचं वजन 50 किलोपेक्षाही कमी आहे. साथीची बॅटरी पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागेल.

एकदा चार्जिंग करण्यासाठी फक्त दीड युनिट वीज खर्च होईल असंही कंपनीने म्हटलं आहे. वीजेचा होणारा खर्च आणि चार्जिंग केल्यानंतर गाडी जितके अंतर जाईल याबाबत कंपनीने केलेल्या दाव्यानुसार 60 किलोमीटर अंतरासाठी फक्त 12 रुपये खर्च येईल. 

टेको इलेक्ट्राच्या या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये अनेक जबरदस्त अशी फीचर्स आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट, सेंट्रल लॉकिंग सिस्टिम, अँटि थेफ्ट अलार्म, स्मार्ट रिपेअर फंक्शन, फ्रंट आणि रिअर बास्केट आणि फास्ट चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे. साथी मोपेड दोन्ही बाजुला टेलेस्कोपिक सस्पेंशन असलेली आहे. ब्लॅक अलॉय व्हील्स, 10 इंच ट्यूबलेस टायर आणि ड्रम ब्रेकसुद्धा आहे. गाडीचे टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. 

टेको इलेक्ट्रा साथीची लांबी 1720mm, रुंदी 620mm आणि 1050mm उंची आहे. साथी स्टील रेनफोर्स्ड चेसीसवर आधारीत असून सध्या मार्केटमध्ये असलेल्या Gemopai Miso या इलेक्ट्रिक बाइकशी या गाडीची स्पर्धा असणार आहे. पुण्यामध्ये ऑन रोड या गाडीची किंमत 57 हजार 697 रुपये इतकी असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com