पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय ८ जीबी रॅमसह येणारा फोन, ११ हजारात करा खरेदी | Smartphone Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tecno Smartphone

Smartphone Offer: पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात मिळतोय ८ जीबी रॅमसह येणारा फोन, फक्त ११ हजारात करा खरेदी

Tecno Pova 4 Smartphone sale: स्मार्टफोन ब्रँड टेक्नोने काही दिवसांपूर्वीच आपला स्वस्त हँडसेट Tecno Pova 4 ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. या फोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. फोनला Amazon आणि जिओ मार्टवरून फक्त ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. टेक्नोचा हा फोन ६००० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. या फोनला क्रायोलाइट ब्लू आणि यूरोनिलोथ ग्रे रंगात खरेदी करू शकता.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Tecno Pova 4 वरील ऑफर्स

Tecno Pova 4 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. परंतु, फोनला एचडीएफसी बँकेचे कार्ड वापरून १० टक्के इंस्टंट डिस्काउंटसह खरेदी करू शकता. म्हणजेच, फोनवर १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

Tecno Pova 4 चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Pova 4 मध्ये ६.८ इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी९९ प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबीपर्यंत UFS२.२ स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट मिळतो.

हेही वाचा: Cyber Fraud: जामताडाच्या स्कॅमर्सचा नवा कारनामा, विना OTP खात्यातून उडवले ५० लाख; पाहा कशी केली फसवणूक

टेक्नोच्या या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि सेकेंडरी सेंसर एआय आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. रियर कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅशचा देखील सपोर्ट मिळतो.

फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. याशिवाय, १० वॉट रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. याशिवाय, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, ड्यूल बँड वाय-फाय आणि एफएम रेडिओचा देखील सपोर्ट मिळेल.

टॅग्स :phoneMobile Phone