सर्वात फायदेशीर प्रीपेड प्लॅन्स! डिस्ने+हॉटस्टार एक वर्ष फ्री; दररोज 3GB डेटा | Sci-Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात फायदेशीर प्रीपेड प्लॅन्स! डिस्ने+हॉटस्टार एक वर्ष फ्री; दररोज 3GB डेटा
सर्वात फायदेशीर प्रीपेड प्लॅन्स! डिस्ने+हॉटस्टार एक वर्ष फ्री; दररोज 3GB डेटा

फायदेशीर प्रीपेड प्लॅन्स! डिस्ने+हॉटस्टार फ्री; डेली 3GB डेटा

टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक सर्वोत्तम ऑफर करत आहेत. यापैकी काही योजना अशाही आहेत, ज्यामध्ये OTT Appsचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. युजर्स देखील आजकाल तेच प्लॅन पसंत करत आहेत, ज्यामध्ये अधिक डेली डेटा आणि विनामूल्य कॉलिंगसह लोकप्रिय OTT Appsचा विनामूल्य एक्‍सेस आहे. येथे Airtel, Jio आणि Vodafone-Idea (Vi) च्या अशाच काही योजनांबद्दल सांगत आहोत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचे (Disney + Hotstar) एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन आणि 3 GB पर्यंत डेटासह दररोज मोफत कॉलिंग मिळते. (Telecom companies have come up with the cheapest prepaid plans for the users)

एअरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरासाठी या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंगची ऑफर देत आहे. याशिवाय डिस्ने + हॉटस्टार मोबाईल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शनही या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी दिले जात आहे. प्लॅनमध्ये, कंपनी 30 दिवसांसाठी Amazon Prime Video च्या मोबाईल आवृत्तीची मोफत ट्रायल देखील देत आहे.

हेही वाचा: TATA अन्‌ Birla चे 'हे' दोन शेअर्स पाडताहेत नोटांचा पाऊस!

एअरटेलचा 838 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईल एडिशन एक वर्षासाठी मोफत सदस्यता आणि Amazon प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशनची 30-दिवसांची विनामूल्य ट्रायल समाविष्ट आहे.

जिओचा 601 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. कंपनी या प्लानमध्ये 6 GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे ज्याची वैधता 28 दिवस आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग फायदे देखील मिळतील. या प्लॅनमध्ये कंपनी डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन सोबत एक वर्षासाठी Jio ऍप्सवर मोफत प्रवेश देखील देत आहे.

जिओचा 799 रुपयांचा प्लॅन

56 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. युजर्सच्या मनोरंजनासाठी कंपनी या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ ऍप्सचा मोफत प्रवेश मिळेल.

हेही वाचा: स्टार्टअप्स देणार 20 लाख लोकांना रोजगार! असा आहे सरकारचा प्लॅन

व्होडाफोन-आयडियाचा 601 रुपयांचा प्लॅन

Vodafone-Idea च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3 GB डेटा मिळेल. कंपनी Disney + Hotstar च्या फ्री सब्सक्रिप्शनसह 16 GB अतिरिक्त डेटा देत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight यांचा समावेश आहे.

व्होडाफोन-आयडियाचा 901 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये कंपनी 70 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये 48GB अतिरिक्त डेटासह Disney+ Hotstar ची एक वर्षासाठी मोफत सदस्यता देखील देण्यात आली आहे. इतर प्लॅन्सप्रमाणे दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे 601 रुपयांच्या प्लॅनचे आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top