Telegram Update : टेलिग्राममध्ये आले 3 गेमचेंजर फीचर्स; स्पॅमचा त्रास कायमचा संपणार, नवीन अपडेटमध्ये आणखी काय खास? लगेच पाहा

Telegram New Features Updates To Prevent Spam : टेलिग्रामने त्याच्या नवीन अपडेटमध्ये स्पॅम कमी करण्यासाठी आणि युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्स आणले आहेत.
Telegram New Features Updates To Prevent Spam
Telegram New Features Updates To Prevent Spamesakal
Updated on

Telegram New Features : टेलिग्रामने आपल्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आणले आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक उपयुक्त फीचर्स समाविष्ट करण्यात आले असून, स्पॅम कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय वापरकर्त्यांना नवीन गिफ्टिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत जे टेलिग्रामचा अनुभव अधिक मनोरंजक बनवतील.

स्पॅम टाळण्यासाठी "Star for new messages" फीचर

Telegram Premium वापरकर्त्यांसाठी एक नवं खास फीचर आणलं आहे Star for new messages. या फीचरद्वारे वापरकर्ते आपल्या संपर्क यादीबाहेरील लोकांकडून संदेश मिळवण्यासाठी निश्चित शुल्क (Stars) ठरवू शकतात. यामुळे अनावश्यक संदेश कमी होतील, इनबॉक्स क्लीन राहील आणि युजर्सना Telegram Stars द्वारे कमाई करण्याची संधी मिळेल.

"Contact Confirmation" फीचर

टेलिग्रामवर अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशांवर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी Contact Confirmation हे नवं फीचर जोडण्यात आलं आहे. या फीचरमुळे जेव्हा कोणी नवीन व्यक्ती तुम्हाला संदेश पाठवते, तेव्हा एक माहितीपत्रक स्क्रीनवर दिसेल. या पेजवर पाठवणाऱ्या व्यक्तीची काही महत्त्वाची माहिती उपलब्ध असेल, जसे की

Telegram New Features Updates To Prevent Spam
ISRO Latest Update : इस्रोने दिली मोठी खुशखबर! दोन नवे लॉन्चपॅड्स अन् Chandrayaan-4 मिशनची तयारी जोरात सुरू, आणखी काय खास?
  • त्या व्यक्तीचा देश

  • तुम्ही आणि तो व्यक्ती कोणत्या ग्रुपमध्ये आहात

  • त्या अकाऊंटची जुनी माहिती (तो Telegram वर अॅड झाला)

त्या युजरचे अकाऊंट व्हेरिफाइड आहे का?

हे फीचर वापरकर्त्यांना अनोळखी लोकांकडून मिळणाऱ्या संदेशांविषयी अधिक माहिती देईल आणि सुरक्षितता वाढवेल.

Telegram Stars वापरून गिफ्ट सबस्क्रिप्शन

टेलिग्रामने Stars प्रणाली सुरू केली आहे. ज्यात युजर्सना Premium सबस्क्रिप्शन गिफ्ट करण्याची सुविधा दिली आहे. वापरकर्ते Star Messages द्वारे कमावलेले Stars 21 दिवसांनंतर काढून घेऊ शकतात आणि त्याचा Telegram जाहिरातींसाठी उपयोग करू शकतात.

Telegram New Features Updates To Prevent Spam
Samsung Galaxy S23 Discount : एक लाखाचा मोबाईल 27 हजारांत! Samsung Galaxy प्रीमियम फ्लॅगशिप फोनवर 50% डिस्काउंट, ऑफर्स पाहा एका क्लिकवर

प्रोफाइल कव्हरवर गिफ्ट पिन करण्याचा पर्याय

टेलिग्रामने आणखी एक खास पर्याय दिला आहे, ज्याद्वारे वापरकर्ते आपल्या प्रोफाइल कव्हरवर 6 पर्यंत गिफ्ट्स पिन करू शकतात. यासाठी Settings > My Profile > Gifts या सेक्शनमध्ये जाऊन गिफ्ट मॅनेज करता येतील.

टेलिग्रामच्या या नव्या अपडेटमुळे वापर अधिक सुरक्षित, मनोरंजक आणि उपयुक्त होणार आहे. नवीन फीचर्समुळे स्पॅम नियंत्रित करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com