Pavel Durov Arrested
Pavel Durov Arrested

Telegram CEO Pavel Durov: टेलिग्रामचे संस्थापक आणि CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण?

Pavel Durov arrested: टेलिग्राफ मेसेजिंग अॅपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव (Pavel Durov) यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर (Bourget airport) अटक करण्यात आली आहे.
Published on

पॅरिस- टेलिग्राफ मेसेजिंग अॅपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव (Pavel Durov) यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर (Bourget airport) अटक करण्यात आली आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे

टेलिग्राम हे प्रामुख्याने रशिया, युक्रेन आणि सोवियत रशियामधील देशामध्ये प्रसिद्ध आहे. फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, टीकटॉकनंतर टेलिग्राम हे सर्वात मोठे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. येत्या काळात टेलिग्रामचे युझर्स हे १ अब्ज होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com