नॅनो सारखी दिसणारी होंडा कार देते जबरदस्त मायलेज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनी या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देते. ही कार उत्तम ब्रेकिंग सिस्टीम तसेच मजबूत सस्पेंशनसह येते.
honda car
honda cargoogle
Updated on

मुंबई : Honda Jazz ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मिड रेंज कारपैकी एक आहे. आकर्षक लुक आणि अनेक आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ही कार लोकांना आवडते. या कारमध्ये तुम्हाला मजबूत इंजिनसोबतच जास्त मायलेज पाहायला मिळेल.

या कारचे तीन ट्रिम्स कंपनीने बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याच्या प्लॅनवर काम करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये कारची संपूर्ण माहिती देणार आहोत.

होंडा जॅझ कारची वैशिष्ट्ये :

Honda Jazz कारमध्ये कंपनीने 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 90 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क बनविण्यास सक्षम आहे. कंपनी या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देते. ही कार उत्तम ब्रेकिंग सिस्टीम तसेच मजबूत सस्पेंशनसह येते. कंपनीच्या बाजारात उपलब्ध असलेली ही अतिशय लोकप्रिय कार आहे.

होंडा जॅझ कारची किंमत:

Honda Jazz कारमध्ये दिलेल्या मायलेजबद्दल बोलताना कंपनी म्हणते की, Honda Jazz कार ARAI द्वारे प्रमाणित एक लिटर पेट्रोलमध्ये 17.1 किमी पर्यंत चालवता येते.

कंपनीने या मिड-रेंज हॅचबॅक कारला अतिशय आकर्षक लूक दिला असून यामध्ये अधिक मायलेजही दिला आहे. ही कार कंपनीने ₹ 7.90 लाखांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध करून दिली आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ₹ 10.21 लाख निश्चित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com