Melvil Dewey : डिवी दशांश प्रणालीचे जनक 'मेल्विल डिवी' यांची गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Melvil Dewey

डिवी दशांश प्रणालीचे जनक मेल्विल डिवी यांच्या जन्मदिनानिमित्तानं सहज हा प्रपंच !

डिवी दशांश प्रणालीचे जनक 'मेल्विल डिवी' यांची गोष्ट

‘लायब्ररी’ (Library) ही आपल्या सगळ्यांची एक आवडती जागा. मला शाळकरी वयापर्यंत ‘ग्रंथपाल’म्हणजे फक्त उशीर झाल्यास दंड आकारणारा इसम आहे असं वाटायचं. मेडिकलला (Medical) आल्यानंतर तिथली भलीमोठी ‘लायब्ररी’बघितले तेव्हा मात्र डोळे फिरले. हे एवढं सगळं सांभाळणं ‘येड्यागबाळ्याचे काम नव्हे’ हे लक्ष्यात आलं.

हेही वाचा: Henry Ford : पहिलंवहिलं बाईक इंजिन बनवणाऱ्या अवलियाची गोष्ट

‘ग्रंथपाल’कोण आहे हे बघितलं तर तिथं कुणी नव्हतं मात्र टेबलवरच्या लाकडी ठोकळ्यावर ग्रंथपालांच्या नावापुढं असलेल्या कंसातील बी.लिब अर्थात ‘बॅचलर ऑफ लायब्ररी ॲंड इम्फर्मेशन सायन्स’ही पदवी वाचली आणि ही एक आख्खी वेगळी ‘विज्ञानशाखा’आहे हे पहिल्यांदाच कळलं. आज या विज्ञानशाखेसंबंधित गोष्ट सांगतो. त्याचा जन्म जोएल आणि एलिझा या दाम्पत्याच्या पोटी न्युयॉर्क (New York) शहरात झाला. हे या दोघांचे पाचवे आणि शेवटचे अपत्य. वडिल जोएल बुटं शिवायचे तर आई पारंपरिक गृहकर्तव्यदक्ष गृहिणी होती. परिस्थितीमुळे असेल पण बालपणापासूनच यालाही स्वावलंबनाची गोडी निर्माण झाली.

तो वडिलांना हिशेबात आणि आईला घरखर्चाचं बजेट आखण्यात मदत करायचयं, त्यामुळे त्याचे आकडेमोड करणे, नोंदी करणे हे कौशल्य पक्के झाले पण शिक्षण मात्र मंदावले. शाळकरी वयातच त्याला ‘लोकशिक्षण’हे आपलं क्षेत्र आहे याची जाणीव झाली. अल्फ्रेड विद्यापीठातील ॲम्हरेस्ट महाविद्यालयात (Amherst College) त्याने पदवीपर्यंतचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. शेवटी उत्पन्नाचे साधन म्हणून विद्यार्थीदशेतच त्याने ‘लायब्ररी ब्युरो’नावाचा उपक्रम सुरू केला. इथं तो अनुक्रमणिका, याद्या, बुकमार्क या गोष्टींची विक्री करायचा.

हेही वाचा: Constantine Fahlberg : 'सॅकरीन'चा शोध लावणाऱ्या अवलियाची गोष्ट

वरवर हा ‘रिकामा उद्योग’ वाटत असला तरी अनेक विद्यार्थी काय काही शिक्षकही त्याचे नियमित ग्राहक होते, कारण या त्याच्या साहित्यामुळे पुस्तकं-संदर्भ शोधणं सुलभ तर व्हायचंच पण प्रचंड वेळही वाचायचा. तरुण वयातच त्यानं उच्चारायला आणि लिहायला क्लिष्ट असलेल्या नावांचं सुलभीकरण व्हावं अशी अभिनव कल्पना मांडली होती. हळूहळू अभ्यासकांसाठी महत्वाची जागा असलेल्या तो ‘लायब्ररी’या जागेचा तज्ज्ञच झाला होता. दुसऱ्या बाजूला त्याने आपले उरलेलं शिक्षणही पुर्ण केलं. एवढंच नाही तर त्यानं कोलंबिया विद्यापीठातल्या भल्यामोठ्या लायब्ररीची जबाबदारीही लिलया पेलून दाखवली ती ही एकदोन दिवस नव्हे तर तब्बल पाच वर्षे.

न्युयॉर्कच्या लायब्ररीत देखील त्यानं संचालकपद सांभाळलं आणि फिरत्या लायब्ररीची कल्पनाही अंमलात आणली पण त्याच्यासाठी एक लायब्ररी किंवा तश्या अजून काही लायब्ररी एवढंच अपेक्षित नव्हतं त्याचा पिंड कार्यकर्त्याचा होता त्यामुळे ज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा याकडे त्याचा कल होता. या सगळ्या अनुभवातून त्याने पुस्तकांचे वर्गीकरण करण्यासाठी ‘दशांश प्रणाली’ सुरू केली. ज्यात विषयांची अनुक्रमणिका, त्यातल्या पुस्तकांच्या नावाची यादी, लेबलिंग आणि तद्नुषंगाने मांडणी अशी पद्धती विकसित केली जी आजही जगभरात अवलंबली जाते.

हेही वाचा: 'SONY'ची उलाढाल बिलियन डॉलर्समध्ये घेऊन जाणाऱ्या अवलियाची गोष्ट

Web Title: The Story Of Melville Dewey The Father Of The Divi Decimal System

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MedicalCollegeNew York
go to top