esakal | स्क्रिन शॉटवर लिहाल ते गुगल लेन्स ट्रान्सलेट करील

बोलून बातमी शोधा

google lens
स्क्रिन शॉटवर लिहाल ते गुगल लेन्स ट्रान्सलेट करील
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः गुगल एक नवीच गंमत घेऊन येत आहे. तुम्ही फक्त स्क्रिनवर लिहायचं. त्यानंतर ते अॉटोमॅटिक ट्रान्सलेट होईल. एका इंग्रजी वेबसाईटने ही माहिती दिलीय. ते म्हणतात, गुगल लेन्समध्ये नवे अपडेट आले आहेत. स्क्रीन शॉटवर तुम्ही जे लिहाल ते ट्रान्सलेट होईल.

गुगल वारंवार आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक आणि उपयोग बनवत आहे. स्क्रीनशॉटवर टेक्स्ट ट्रान्सलेशनशिवया स्क्रिन शॉट्सवर लिहिलेल्या टेक्स्टला कॉपीही केलं जाऊ शकतं. ज्याला आपण अॉफलाईनही वापरू शकता. सोबतच या टेक्स्टला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि शेअर करू शकता.

हे फिचर अँड्रॉईड ११या वरील रेंजच्या फोनमध्ये चालेल. त्याखालील फोनमध्ये चालेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. अँड्रॉईड १२ या वर्षी लाँच केला जाणार आहे.

गुगल लेन्सला पहिल्यांदा २०१७मध्ये गुगल आयओमध्ये समाविष्ट केलं होतं. हा एक रिकॉग्नायझेशन टूल आहे. जे पहिले गुगल असिस्टेंटसोबत आलं होतं. पूर्वी हा टुल गुगल पिक्सल २ आणि गुगल पिक्सल २ एक्स एल मध्ये काम करीत होते. एक वर्षानंतर २०१८मध्ये याला गुगल फोटोज आणि अन्य अँड्रॉईड डिवाइसला सपोर्ट करायला लागले.

२०१८च्या जूनमध्ये या सेवेला वेगळ्या अॅपमध्ये लाँच केले गेले. जे गुगल प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध केले होते. काही महिन्यांतच ते ५० कोटी लोकांनी डाऊनलोड केले होते.