भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होतायत हे 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमती, फिचर्स

these 5g smartphone are launched soon in the Indian market Marathi article
these 5g smartphone are launched soon in the Indian market Marathi article
Updated on

पुणे : जर तुम्ही आजच्या घडीला 5 जी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा काही पर्यायांबद्दल माहिती असायला हवी जे तुमच्यासाठी अधिक चांगले असतील. येत्या काही महिन्यांत देशात काही जबरदस्त 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. या सर्व 5 जी स्मार्टफोनची किंमत वेग-वेगळी आहे. हे सर्व फोन जबरदस्त स्टोरेजसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आज आपण अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत

वनप्लस 9  OnePlus 9

वनप्लसचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्याची किंमत अंदाजे 50,000 रुपये असल्याचा अंदाज आहे. या फोनच्या फिचर्सविषयी सांगायचे तर यात 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 4500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे कॅमेरे देण्यात आले आहेत.


शाओमी रेडमी नोट 9 प्रो 5 जी Xiaomi Redmi Note 9 Pro 5G

शाओमीचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लॉन्च होईल. याची किंमत 17,990 रुपये असल्याचा अंदाज आहे. यात 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि 4820 mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये दर्जेदार रीअर कॅमेरा सेटअप आणि शानदार सेल्फी कॅमेरा आहे.


मोटोरोला एज एस Motorola Edge S

मोटोरोला कंपनी सतत 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे. हा मोटोरोला फोन मे 2021 मध्ये बाजारात येईल, ज्याची किंमत अंदाजे 23,000 रुपये आहे. त्यात बरीच प्रगत फिचर्स देण्यात आली आहेत. या 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 870 जी प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय दर्जेदार कॅमेरे देण्यात आले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com